जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजारानं निधन

जैन मुनी तरुण सागर यांचं वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झालंय. 

Updated: Sep 1, 2018, 07:49 AM IST
जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजारानं निधन  title=

मुंबई : जैन मुनी तरुण सागर यांचं वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झालंय. दीर्घ आजारानं त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. २० दिवसांपासून ते काविळने त्रस्त होते यातच त्यांची तब्ब्येत अधिक खालावत गेली. त्यांच्या राहत्या ठिकाणी देशभरांतून भक्तगण येत आहेत. आज दुपारी ३ वाजता दिल्लीच्या मेरठ हायवे येथील तरुणसागरम तीर्थ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी ७ वाजता सुरु झालेली त्यांची अंत्ययात्रा दिल्लीपासून सुरूवात होत २८ कि.मी दूर तरुणसागरम येथे पोहोचेल.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली 

 तरुण सागर यांची तब्बेत खूपच खालावली होती. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यातं आलं होतं. जगभरात त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जात होती. त्यांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं तिथे केवळ जैन मुनि आणि शिष्यांनाच जाण्यास परवानगी होती.