जैश ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर ठार ?

जैश ए- मोहम्मद या दहशतावादी संघटनेचा म्होरक्या व कुख्यात दहशतवादी मसूद अजहर

Updated: Mar 3, 2019, 06:39 PM IST
जैश ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर ठार ? title=

नवी दिल्ली : जैश ए- मोहम्मद या दहशतावादी संघटनेचा म्होरक्या व कुख्यात दहशतवादी मसूद अजहर ठार झाल्याचे वृत्त माध्यमांतून समोर येत आहे. पण खरेच हा मृत्यू झाला का ? या बद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर येत नाही. भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईत मसूद अजरह ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही दिवसांपासून किडनी संबंधातील त्रास होता त्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. पाकिस्तानकडूनही या मसूदच्या मृत्यूच्या बातमीला अद्याप दुजोरा देण्यात आला नाहीए. थोड्या वेळात याबाबत स्पष्टता येईल. 

Image result for masood azhar zee news

किडनीच्या त्रासामुळे मसूद अजहर खूप त्रस्त होता. यामुळे त्याला घरातून बाहेर पडणेही कठीण झाले होते. याबाबत पाकिस्तानी पररराष्ट्र मंत्रालयाने कबुली दिली होती. 

कोण आहे हा मसूद अझहर?

इंडियन एअरफोर्सने 26 फेब्रुवारीला पीओकेच्या बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या कॅंम्पवर हल्ला केला. यामध्ये 300 हून जास्तजण मारले गेल्याचे वृत्त होते. यासोबतच मसूद अजहरचा भाऊ आणि मसूदचा जावई देखील मारला केल्याचे सांगितले गेले. याच हल्ल्यामध्ये मसूद अजहर मारला गेल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांच्या भारतात परतल्यानंतर हे वृत्त जाहीर करण्यात आले असेही सांगण्यात येत आहे. 

मौलाना मसूद अझहरला १९९४ मध्ये अझहरला मध्ये गजाआड करण्यात आलं होतं. त्याची सुटका करण्यासाठी त्याच्याच साथीदारांनी २४ डिसेंबर १९९९ला इंडियन एअरलाईन्सच्या IC 814 या विमानाचं अपहरण केलं होतं. अपहरण करून हे विमान अफगाणिस्तानात कंधारमध्ये नेण्यात आलं. विमानात असणाऱ्या सर्व प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी म्हणून भारताकडून एकूण ३ दहशतवाद्यांना सोडण्यात. त्यात मसूद अझहरचाही समावेश होता.

या हल्ल्यांमध्ये अझहरचा हात

Image result for masood azhar zee news

मार्च २००० मध्ये अझरने जैश ए मोहम्मदची स्थापना केली. भारताच्या संसदेवरील झालेला हल्ला, जम्मू काश्मीरच्या विधानसभेवरील हल्ला, पठाणकोटच्या वायूसेना तळावरील हल्ला आणि नुकताच झालेला पुलवामा दहशतवादी हल्ला या सर्व हल्यांचे कट मसूद अझहरने रचले होते. दहशतवादाच्या त्याच्या क्रूर कृत्यांनी साऱ्या जगाला वारंवार हादरा दिला आहे. 

अझहरने सुरु केलेल्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेने आजवर अनेक दहशतवादी कारवायां करत कित्येक निष्पापांचे बळी घेतले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड, अमेरिका, आणि संयुक्त राष्ट्रांनी 'जैश'ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. पण पाकिस्तानकडून मात्र या संघटनेला आर्थिक पाठबळ असल्याची बाब वारंवार समोर आली. शिवाय अझहरला वाचवण्यासाठी पाकिस्तानला चीनचीही मदत मिळत गेली. परिणामी, त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव अनेकदा मांडला गेला खरा. पण प्रत्येकवेळी चीननं त्यावर आक्षेप नोंदवला. संयुक्त राष्ट्रांमध्ये चीनने त्यांना मिळालेल्या नकारधिकाराचा वापर करून हा प्रस्ताव फेटाळण्याचं सत्र सुरू ठेवलं होतं.

पुलवामा हल्ल्यानंतर निशाण्यावर 

जम्मू- काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात असणाऱ्या अवंतीपोरा येथे जैश-ए-मोहम्मदच्याच दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना प्राण गमवावे लागले. या क्रूरतेचा साऱख्या जगातून निषेध करण्यात आला. सोबतच पुन्हा एकदा भारताकडून संयुक्त राष्ट्रात मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी करण्यात आली.