श्रीनगरमधील पहिल्या महिला IG च्या हाती दहशतवाद विरोधी मोहिमेची धुरा

देशाच्या संरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या... 

Updated: Sep 1, 2020, 03:47 PM IST
श्रीनगरमधील पहिल्या महिला IG च्या हाती दहशतवाद विरोधी मोहिमेची धुरा  title=
छाया सौजन्य- एएनआय

श्रीनगर : देशाच्या संरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या तुकडीपैकी एक म्हणजेच  सीआरपीएफच्या काश्मीर सेक्टरमधील तुकडीला पहिल्या महिला पोलीस अधिकारी भेटल्या आहेत. दहशतवादविरोधा कारवाईचं नेतृत्त्व करण्याची संपूर्ण जबाबदारी CRPF कडून महिला अधिकाऱ्यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. श्रीनगर सेक्टरची संपूर्ण जबाबदारी असणाऱ्या या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे चारु सिन्हा. 

१९९६ बॅचमधील उत्तीर्ण असणाऱ्या चारु या आयपीएस अधिकारी आहेत. तेलंगणा कॅडरच्या सिन्हा यापुढं श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या महानिरिक्षक अर्थात आयजी म्हणून कार्यभार सांभाळतील. 

लष्कर आणि काश्मीर पोलिसांनाही करणार मदत 

श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या आयजीपदी यापूर्वी कधीच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्य़ात आली नव्हती. काश्मीर सेक्टमध्ये सीआरपीएफकडून कायमच दहशतवादविरोधी कारवाया करण्यात आल्या आहेत. परिणामी येत्या काळातही दहशतवादाचं कंबरडं मोडण्यासाठी म्हणून भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांना सहकार्य करण्याची जबाबदारीसुद्धा चारु सिन्हा पार पाडणार आहेत. 

 

आव्हानात्मक भागामध्ये काम करण्याची सिन्हा यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा त्यांनी बिहारमध्ये नक्षलवादाशी लढा देत असताना महानिरिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली होती. ज्यानंतर त्यांची बदली जम्मू येथे बीएसएफच्या आयजीपदी करण्यात आली होती. दरम्यान, सध्या त्यांची बदली करण्यात आलेल्या CRPF च्या श्रीनगर सेक्टरच्या हद्दीत काश्मीरलगत असणारे बडगाम, गांदरबाल, श्रीनगर आणि ल़़डाखचाही समावेश होतो.