काश्मीर यूनिव्हर्सिटीबाहेर ग्रेनेड हल्ला; २ जखमी

पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Updated: Nov 26, 2019, 03:38 PM IST
काश्मीर यूनिव्हर्सिटीबाहेर ग्रेनेड हल्ला; २ जखमी
संग्रहित फोटो

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काश्मीर यूनिव्हर्सिटी गेटबाहेर काही अज्ञात हल्लेखोरांनी ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. 

हा हल्ला नक्की ग्रेनेड हल्ला होता की पेट्रोल हल्ला होता, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 

  

प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, हा ग्रेनेड हल्ला असल्याचं बोललं जात आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.