श्रीनगर : jammu kashmir जम्मू काश्मीर या भागातून वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवाया पाहता, गेल्या काही काळापासून येथील अनेक जिल्ह्यांमध्ये दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले. सुरक्षा यंत्रणा आणि लष्कराच्या अनेक महत्त्वाच्या निर्णय आणि कठोर पावलांमुळं अखेर त्याचे परिणामही दिसून येऊ लागले. अखेर जम्मू काश्मीरधील श्रीनगर हा भाग आता दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यात आल्याची माहिती खुद्द पोलीस यंत्रणांकडून देण्यात आली.
'लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी इश्फाक रशिद खान याला कंठस्नान घातल्यानंतर आता श्रीनगर जिल्ह्यातील कोणताच भाग दहशतवाद्यांच्या सावटाखाली नाही', अशी माहिती काश्मीर झोन पोलीसांच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली.
खान हा मुळचा श्रीनगरच्या सोझेथ भागातील रहिवासी होता. रणबीरगड येथील बाह्यसीमाभागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या एका चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा भागातील एजाज अहमद भट या दहशतवाद्यालाही सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीच कंठस्नान घालण्यात आलं. पोलीस आयुक्त विजय कुमार यांनी रविवारी याबाबतची माहिती दिली.
After #killing of #LeT #terrorist Ishfaq Rashid Khan yesterday, no resident of #Srinagar district in terrorist ranks now: IGP Kashmir @JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) July 26, 2020
दरम्यान, श्रीनगर केव्हाही दहशवाद्यांपासून मुक्त होऊ शकत नाही कारण या भागात इतर भागांतील दहशतवाद्यांची घुसखोरी सुरुच असते, असं काही दिवसांपूर्वीच कुमार म्हणाले होते. पण, आता मात्र दहशतवादविरोधी कारवाईला आलेला वेग पाहता चित्र बदललं असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे ही बाब मात्र नाकारता येणार नाही