Japan First Lady In Saree G20 Gala Dinner: सध्या चर्चा आहे ती म्हणजे दिल्लीत संपन्न होणाऱ्या G20 परिषदेची. यावेळी जगभरातील मानांकित देशांचे राष्ट्रप्रमुख आलेले आहेत. त्यामुळे सध्या त्यांची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी जपानच्या पंतप्रधानांच्या पत्नी, जपानच्या फर्स्ट लेडी यांनी काल संपन्न झालेल्या G20 Gala Dinner ला हिरव्या रंगाची कांजिवरम साडी परिधान केली होती. ज्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. यावेळी त्यांच्या या खास साडीकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा आणि त्यांच्या पत्नी युको किशिदा यांनी केला पार पडलेल्या खास भोजनाला हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांनी फोटोसाठी पोझ दिली होती. यावेळी 50-60 कलाकारांनी भारतीय संगीताची मेजवानी दिली. सोबत Four Course Meal चे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांची मेजवानी होती.
G20 Gala Dinner हे भारत मानडंपम, नवी दिल्ली येथे पार पडले. जपानच्या फर्स्ट लेडी युको किशीदा यांनी पारंपारिक हिरव्या रंगाची कांजिवरम साडी परिधान केली होती.
तामिळनाडू येथील कांजिवरम ही विशेष लोकप्रिय साडी आहे. प्युअर सिल्क आणि धाग्यांपासून बनवलेल्या साडीचे महत्त्व फार मोठे आहे. या साडीचे रंग आणि कलाकुसर ही सर्वांनाच आकर्षित करते. भारतात तयार होणाऱ्या हातमागावरील कपड्यांना विशेष करून साड्यांना फार मोठी मागणी असते. त्याचे उत्पादन आणि विक्रीही फार मोठ्या प्रमाणात होते. त्यासोबत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या साड्यांना आणि कपड्यांना चांगली मागणी आहे. सोबत या साड्यांच्या किमतीही जास्त असतात.
कांजिवरम ही साडी भारतीय कुटुंबात सणासुदीला, लग्नात हमखास परिधान केली जाते. महिलावर्गाला ही साडी जास्त करून आकर्षित करते. यावेळी जपानच्या पंतप्रधानांच्या पत्नी युको किशिदा यांनी सुंदर अशी हिरव्या रंगाची कांजिवरम साडी घातली होती व त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला होता. 8,9,10 सप्टेंबर रोजी या G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आज या परिषेदेचा शेवटचा दिवस आहे. सध्या या परिषदेची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी पाहुण्यांसाठी खास मेजवानी, सोय-सुविधा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी जगभरातील राष्ट्रप्रमुख, आणि जगभरातील महत्त्वाच्या व्यक्तींनी यावेळी हजेरी लावली होती. काल ऋषी सुनक यांच्या फॅशननं सगळ्यांचेच लक्ष वेधले होते.