लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बापाची धडपड, रिक्षावरील मेसेज वाचून डोळ्यात पाणी येईल

Viral News In Marathi: वाढदिवस हा खासच असतो. एका पित्याने मुलीच्या वाढदिवसासाठी अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्याचे प्रयत्न पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 10, 2023, 11:14 AM IST
लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बापाची धडपड, रिक्षावरील मेसेज वाचून डोळ्यात पाणी येईल title=
This auto rickshaw driver giving free rides to people on his birthday daughter viral news

Viral News: वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो. काही जण वाढदिवस दणक्यात साजरा करतात तर काही जणा वाढदिवशी स्पेशल काहीतरी करवून साजरा करतात. पालकांनाही आपल्या मुलांचा बर्थ-डे आठवणीत राहावा असं वाटतं असतं. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. अशातच सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. रिक्षावाल्याने त्याच्या मुलीचा वाढदिवस अनोख्यापद्धतीने साजरा केला आहे. 

एखादा सण किंवा कार्यक्रम साजरा करताना लाखो करोडोंचा खर्च केला जातो. मात्र, देशातील काही जनता त्यांच्याकडे असलेल्या पैशातून व गरजेच्या सामानातूनही आनंद साजरा करतात. अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट लोकांचे मन जिंकत आहे. आयएएस ऑफिसर अवनीश शरण यांनी ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. सोबतच एक फोटोही देण्यात आला आहे. यात रिक्षाच्या मागे एक कागद चिकटवण्यात आला आहे. यात लिहलेला मजकूर लोकांचे मन जिंकून घेत आहेत. 

रिक्षाच्या मागे लिहलेल्या कागदात एक मजकूर लिहिला होता, आज दिनांक 11/08/2023 रोजी आमची मुलगी अर्पिता यादवचा वाढदिवस आहे. आजच्या या आनंदाच्या दिवशी ही माझी रिक्षा फ्री असेल. मी कोणाकडूनच आज भाडे घेणार नाही, हॅपी बर्थ-डे, असं यात लिहण्यात आले आहे. रिक्षावाल्याचा हा दिलदारपणा पाहून अनेक जण भारावले आहेत. 

आयएएस अवनीश चरण यांनीही ट्विटरवर हा फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे. माणसाचे मन मोठे असणे गरजेचे आहे पैसे असणे गरजेचे नाही. Happy Birthday Arpita, असं ट्विट त्यांनी लिहलं आहे. 13 ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आलेल्या पोस्टला आत्तापर्यंत 4 लाख 29 हजाराहून जास्त लोकांनी पाहिलं आहे. तर, 21 हजाराहून अधिक लोकांनी या पोस्टला लाइक केले आहे. पोस्टवर अनेकांनी कमेंटदेखील केल्या आहेत.

अनेकांनी अर्पिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, मुलीचे प्रेमच असे असतं की एखाद्या गरिबालाही राजासारखा अनुभव मिळवून देते. तर, काहींनी अर्पिताच्या वडिलांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. एका मुलीच्या जन्मासोबतच एका प्रेमळ पित्याचाही जन्म होतो, अशी एक कमेंटही केली आहे.