कर्नाटक :भाजपच्या ऑपरेशन कमळने हादरलेल्या काँग्रेसने आता सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने कर्नाटकात राजकीय नाट्य रंगलेले पाहायला मिळत आहे. कर्नाटक सरकारमधून समर्थन काढल्यानंतर दोन्ही आमदार कोणत्याही पार्टीशी जोडले गेले नाहीत. ते अपक्ष आहेत असे वक्तव्य माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलर (JDS) प्रमुख एचडी देगेगौडा यांनी केले आहे. या गोष्टीला खूप महत्त्व दिले जात आहे, तसे करण्याची गरज नाही. मीडियामुळे या प्रकरणाला हवा मिळत अलल्याचेही ते म्हणाले.
HD Deve Gowda. former PM and JDS Chief: The two MLAs(who withdrew support from Karnataka Govt) are not affiliated with any party. They are independents. There is no need to hype it up so much. It is all a media hype. pic.twitter.com/ObDWT53sAR
— ANI (@ANI) January 16, 2019
2 Independent MLAs, H Nagesh and R Shankar, withdraw their support from Karnataka govt. pic.twitter.com/C34u3BNFOb
— ANI (@ANI) January 15, 2019
मंगळवारी अपक्ष आमदार एच नागेश आणि केपीजेपीचे आमदार आर शंकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी भाजपचे १०४, काँग्रेसचे ८० तर जेडीएसचे ३७ आमदार आहेत. बसपा, केपीजेपी आणि अपक्ष असे प्रत्येकी एक आमदार आहे. त्यामुळे ऐन संक्रांतीच्या दिवशी कर्नाटक सरकावरच संक्रांत आल्याचे पाहायला मिळत आहे.
कर्नाटक राज्य प्रभारी के. सी. वेणूगोपाल आणि माजी मुख्यमंत्री के. सिद्धरामय्या यांची उशीरापर्यंत बैठक झाली. बैठकीनंतर राज्यातलं सरकार स्थिर असल्याचा सिद्धरामय्या यांनी दावा केलाय. मुंबईला गेलेले आमचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केलाय. गेलेले आमदार लवकरच परत येतील असा दावा केला जातोय. तसंच काँग्रेसही काही भाजप आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केलाय.