दुसऱ्यांदा बाप झाल्यावर रोहित शर्माने केली पहिली पोस्ट, फोटो शेअर करून दिली गुडन्यूज

शुक्रवारी रात्रीपासून रोहित शर्माच्या घरी बाळाचे आगमन झाल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता स्वतः रोहित आणि पत्नी रितिका यादोघांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

पुजा पवार | Updated: Nov 16, 2024, 03:27 PM IST
दुसऱ्यांदा बाप झाल्यावर रोहित शर्माने केली पहिली पोस्ट, फोटो शेअर करून दिली गुडन्यूज title=
(Photo Credit : Social Media)

Rohit Sharma Second Child : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्यांदा बाबा झाला असून त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शुक्रवारी रात्रीपासून रोहित शर्माच्या घरी बाळाचे आगमन झाल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता स्वतः रोहित आणि पत्नी रितिका यादोघांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Sharma (rohitsharma45)

2015  रोजी क्रिकेटर रोहित शर्मा याने त्याची मॅनेजर आणि मैत्रीण असलेल्या रितिका सजदेहशी लग्न केले. त्यानंतर या जोडप्याला 2018 मध्ये गोंडस मुलगी झाली जिचे नाव समायरा असे ठेवण्यात आले. रोहित नई रितिकाने आता दुसऱ्या मुलाच्या जन्माविषयी खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्याने लिहिले की, 'family the one where we are four' म्हणजे एक कुटुंब जेथे आम्ही चौघे आहोत. 

भारतीय टेस्ट टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तिथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअंतर्गंत पाच टेस्ट मॅचची सिरीज खेळणार आहे. पहिला सामना 22 नोव्हेंबर रोजी पर्थमध्ये खेळला जाणार आहे. रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता घरात बाळाचे आगमन झाल्यानंतर तो पर्थ टेस्टमध्ये खेळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.