Gold Hallmarking च्या विरोधात आज ज्वेलर्स संपावर; जाणून घ्या कारण

 चांगल्या प्रतिसादानंतरही ज्वेलर्स हॉलमार्किंगच्या विरोधात आज संपावर आहेत. ज्वेलर्सचे म्हणणे आहे की, यामुळे इंस्पेक्टर राज पुन्हा परत येईल. सरकारने ज्वेलर्सला संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

Updated: Aug 23, 2021, 10:49 AM IST
Gold Hallmarking च्या विरोधात आज ज्वेलर्स संपावर; जाणून घ्या कारण

नवी दिल्ली :  गोल्ड ज्वेलरीवर अनिवार्य हॉलमार्किंगबाबत ज्वेलर्समध्ये नाराजी आहे. देशातील 350 सराफा व्यवसायिक संघटनांनी याविरोधात आज संप पुकारला आहे. ज्वेलर्स संघटनांचे म्हणणे आहे की,  आतापर्यंत गरजेनुसार हॉलमार्किंग सेंटर्स बनवण्यात आलेले नाही. ज्यामुळे ज्वेलरी हॉलमार्किंगसाठी अनेक दिवसांपर्यंत वाट पहावी लागते. ज्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.

ज्वेलर्सचा HUID ला विरोध
ऑल इंडिया जेम ऍंड ज्वेलरी डोमॅस्टिक कॉऊंसिलचे म्हणणे आहे की, हॉलमार्किंग युनिक आयडी HUID एक खूपच किचकट आणि मंद गतीची प्रक्रिया आहे.  यामुळे पूर्ण व्यवसाय ठप्प होण्याचा अंदाज आहे.  यामुळे आम्ही याचा विरोध करीत आहोत.

ज्वेलर्सचे म्हणणे आहे की, यामुळे इंस्पेक्टर राज पुन्हा येईल. तसेच HUID ची सिस्टिम अद्याप पूर्ण सक्षम नाही. एकाच पीसवर डबल HUID, ज्वेलरीच्या अनेक पीसवर एकच एकच HUID सारखे काही मुद्दे आहेत.

या संपादरम्यान सर्व ज्वेलर्स, शोरूम, मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद राहतील.  अनेक ज्वेलर्स धरणे आंदोलन  देखील करणार आहेत.