काश्मीरमध्ये दहशतवादी आयईडी स्फोटात चार जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात चार पोलीस शहिद झालेत. तर एक पोलीस गंभीर जखमी झालाय. 

Updated: Jan 6, 2018, 12:24 PM IST
काश्मीरमध्ये दहशतवादी आयईडी स्फोटात चार जवान शहीद title=

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात चार पोलीस शहिद झालेत. तर एक पोलीस गंभीर जखमी झालाय. 

सोपोर येथे आज सकाळी दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात चार पोलीस शहीद झाले असून एक पोलीस गंभीररित्या जखमी झाला आहे.

काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम उघडली असून त्यात अनेक मोठे दहशतवादी मारले गेले आहेत पण त्याचवेळी दहशतवादीसुद्धा सुरक्षा पथकांना टार्गेट करत आहेत.