सोपोरच्या बसस्टॅण्डवर ग्रेनेड हल्ला, १५ जण जखमी

जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये बस स्टॅंडवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला.

Updated: Oct 28, 2019, 05:59 PM IST
सोपोरच्या बसस्टॅण्डवर ग्रेनेड हल्ला, १५ जण जखमी

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये बस स्टॅंडवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. सोमवारी दुपारी झालेल्या या हल्ल्यात १५ हून अधिक नागरिक जखमी झाले. सुरक्षा जवानांनी बस स्टॅंड घेरले असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षाकर्मींवर निशाणा साधत हे ग्रेनेड फेकले होते अशी माहिती समोर येत आहे. जखमी झालेल्यांमध्ये एक महिला देखील आहे. 

रविवारी राजौरीमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमारेषेचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांना त्यांनी लक्ष्य केले. राजौरी जिल्ह्याच्या सीमेवर सुंदरबनी सेक्टरमध्ये कोणतीही सुचना न देता गोळीबारी केली. यामध्ये एक भारतीय जवान जखमी झाले. जखमी झालेल्या सैनिकाबद्दल अधिक माहिती मिळाली नाही. 

पाकिस्तानकडून झालेल्या फायरिंगचे भारताकडून जशास तसे उत्तर देण्यात आले. यामध्ये पाकिस्तानच्या चौक्यांवरही निशाणा साधला.