मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईनं त्याला घट्ट उराशी धरलं समोरून ट्रक आला आणि....

अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ, पाहिल्यानंतर या आईला तुम्हीही म्हणाला मदर ऑफ द ईयर!

Updated: Apr 27, 2022, 06:12 PM IST
मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईनं त्याला घट्ट उराशी धरलं समोरून ट्रक आला आणि....  title=

मुंबई : प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी जीवाचं रान करते. लेकरावर संकट आलं तर वेळप्रसंगी वाघीण होते तर लेकराला लागलं तर तिच्या डोळ्यातील अश्रू लेकरासाठी मलम होतात. मुलाला खरचटू नये म्हणू वेळप्रसंगी ती आपले प्राणही धोक्यात घालते. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ जोफ्रा आर्चरने शेअर केला आहे.

अपघाताचा हा व्हिडीओ अंगावर शहारा आणणारा आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता बाईकवरून आई मुलगा जात असताना अचानक आई आणि मुलगा खाली कोसळतात. त्यांच्या अंगावरून ट्रकचं चाक जाणार तेवढ्यात आई मुलाला उराशी घट्ट पकडून त्याचे प्राण वाचवते. 

अपघाताचा हा व्हिडीओ अंगावर एक क्षण काटा आणतो. जोफ्रा आर्चरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मदर ऑफ द ईयर असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ त्याने शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.