ये बया ... नको ना हसू असं, या पत्रकाराला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळेची ही घटना आहे. 

Updated: Feb 28, 2020, 05:27 PM IST
ये बया ... नको ना हसू असं, या पत्रकाराला title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळेची ही घटना आहे. डोनल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेत हा भारतीय पत्रकार डोनाल़्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारत होता. प्रश्न इंग्रजीत होता. प्रश्न नेहमी सारख्या इंग्रजीत. ज्या प्रमाणे सर्व भारतीय इंग्रजीत बोलतात तशा लहेजात. 

पण ही पत्रकार बया हसत होती. तोंड मुरडत होती. कसं तरीच तोंड करत होती. आश्चर्य व्यक्त करत होती. भारतीय पत्रकाराच्या प्रत्येक वाक्याला तोंडावरचे रंग आणि भाव बदलत होती.

शेजारच्या महिला पत्रकाराच्या कानात खुसुरपूसुर करत होती. हे दृश्य नेमकं कॅमेऱ्यात टिपलं गेलं आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर सर्व भारतीयांनी सोशल मीडियावर राग व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. ही महिला पत्रकार न्यूयॉर्क पोस्टची पत्रकार आहे.