संघाच्या कार्यक्रमाला नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे

विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे

Updated: Oct 3, 2018, 11:32 AM IST
संघाच्या कार्यक्रमाला नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे title=

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी उपस्थित राहणार आहे. 18 ऑक्टोबरला रेशीमबागबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव होणार आहे. कैलाश सत्यार्थी यांना २०१४ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. संघाने यावेळी त्यांना विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे.

स्वयंसेवकांना करणार मार्गदर्शन

संघासाठी विजयादशमी कार्यक्रम अत्यंत महत्वाचा असतो. सरसंघचालक विजयादशमीला रेशीमबागवरून स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत असतात. देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरसंघचालक या दिवशी संघाची भूमिका स्पष्ट करतात. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूर मुख्यालयात निमंत्रित केल्यानंतर आता संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला कोण उपस्थित राहणार याबाबत कमालीची उत्सुक्ता होती.

कोण आहेत कैलाश सत्यार्थी?

बालकांच्या हक्कांसाठी कैलाश सत्यार्थी हे काम करतात. सत्यार्थी यांनी हजारो बालकांना बालकामगार मुक्त केले आहे. दिल्लीमध्ये राहणारे कैलाश सत्यर्थी जगभरातील बालहक्क चळवळीचे अग्रणी मानले जातात. १९९० मध्ये त्यांनी 'बचपन बचाव' या संस्थेच्या माध्यमातून आपल्या कार्याला सुरुवात केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ८०,००० बाल कामगारांची मुक्तता केली आहे.

दक्षिण आशियातील बालहक्क चळवळीत त्यांचं मोठं योगदान आहे. २००९ साली अमेरिकेने 'डिफेन्डर डेमोक्रसी' या पुरस्काराने कैलाश सत्यर्थी यांचा सन्मान केला होता.