घरातलं भांडण चव्हाट्यावर; पतीला खांबाला बांधून मारहाण

संबंधित दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद आणि भांडण सुरू होतं

Updated: Sep 24, 2019, 11:39 AM IST
घरातलं भांडण चव्हाट्यावर; पतीला खांबाला बांधून मारहाण title=

कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घरातलं भांडण चव्हाट्यावर आलं की काय होतं? हे प्रत्यक्ष पाहायला मिळालं. पती-पत्नीच्या भांडणाचा हायवोल्टेज ड्रामा रस्त्यावर आला आणि मग लोकही त्यात सामील झाले. पत्नीनं पतीला खांबाला बांधून मारहाण केली. महिलेकडून पुरुषाची धुलाई सुरू असलेली पाहून कळवळा असलेली लोकांनीही तरुणाला मारहाण केली. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बाबू पूरवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या किडवाई नगर स्थित हनुमान मंदिराजवळ घडलं. संबंधित दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद आणि भांडण सुरू होतं. त्यामुळेच हे दोघं एकमेकांपासून वेगळेही राहत होते. 

महिलेनं केलेल्या आरोपानुसार, तिचा पती गेल्या अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करत तिला त्रास देत होता. 

ही घटना घडत असताना उपस्थितांपैंकी कुणीतही हा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर अनेकदा शेअरही झाला. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणतंही वक्तव्य करण्यास नकार देण्यात आला.