Lipstick, Nail Polish, Eyeliner वर भारतीय महिलांनी खर्च केले 5000 कोटी; ते ही 6 महिन्यांत

Cosmetics Sales In India: हा अहवाल मागील 6 महिन्यांच्या आकडेवारीवर आधारित असून यामध्ये देशातील केवळ अव्वल 10 शहरांतील खरेदीसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. या अहवालामधून सौंदर्य प्रसादनांच्या व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे याचा अंदाज बांधता येतो.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 2, 2023, 08:20 AM IST
Lipstick, Nail Polish, Eyeliner वर भारतीय महिलांनी खर्च केले 5000 कोटी; ते ही 6 महिन्यांत title=
मागील सहा महिन्यांमधील आकडेवारी आली समोर

Cosmetics Sales In India: पैशांची बचत करण्यामध्ये भारतीयांचा हात कोणीच धरु शकत नाही असं म्हटलं जातं. मात्र मागील काही वर्षांपासून भारतीय लोकही हौसेच्या वस्तूंवर खर्च करण्याचं प्रमाणा वाढल्याचं पहायला मिळतं. त्यातही अशी काही खास क्षेत्र आहेत ज्यामध्ये भारतीयांनी खर्च करण्याचं प्रमाण वाढलं आहे. याच क्षेत्रांपैकी एक म्हणजे कॉस्मॅटिक प्रोडक्ट अर्थात सौंदर्य प्रसादने. नुकताच भारतीयांच्या या कॉस्मॅटिक प्रोडक्ट खरेदीसंदर्भातील एक अहवाल समोर आला आहे. यामध्ये लिपस्टिक, आय लायनर आणि नेल पॉलिशसारख्या प्रोडक्ट्सची भारतीयांना फार मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचं समोर आलं आहे. अगदी आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर केवळ 6 महिन्यांमध्ये 5 हजार कोटींहून अधिक रुपये भारतीयांनी सौंदर्य प्रसादनांवर खर्च केले आहेत.

अव्वल 10 शहरांमधील आकडेवारी

'बिझनेस स्टॅडर्ड'ने छापलेल्या कांतार वर्ल्ड पॅनलच्या एका अभ्यासामध्ये ही आकडेवारीसमोर आली आहे. देशातील 10 अव्वल शहरांमध्ये मागील 6 महिन्यांमध्ये लिपस्टिक, नेल पॉलिश आणि आय लाइनरसहीत एकूण 10 कोटींहून अधिक सौंदर्य प्रसादने विकली गेली आहेत. या खरेदीसाठी ग्राहकांनी एकूण 5 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. ही आकडेवारी केवळ अव्वल 10 शहरांमधील आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचा विचार केल्यास हा आकडा नक्कीच जास्त असणार यात शंका नाही.

ऑनलाइन खदेरीचं प्रमाण वाढलं

अहवालामध्ये भारतीय लोक ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात सौंदर्य प्रसादने खरेदी करतात. यापैकी 40 टक्के खरेदी ही ऑनलाइन माध्यमातून होते. सौंदर्य प्रसादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये प्रामुख्याने काम नोकरदार महिलांचा समावेश आहेत. अनेक वेबसाईटवरील ऑनलाइन सेल, सौंदर्य प्रसादने विकणाऱ्या विशेष वेबसाईट्समुळे सौंदर्य प्रसादनांचा खप वाढला आहे. तसेच त्वचेच्या देखभालीसंदर्भात हल्ली महिला फार जागृक असतात. त्यामुळेच सौंदर्य प्रसादने वापरण्याचा कल वाढल्याचं पहायला मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. 

सर्वाधिक विक्री ओठांशी संबंधित प्रसादनांची

मागील 6 महिन्यांमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या सौंदर्य प्रसादनांमध्ये ओठांशी संबंधित सौंदर्य प्रसादने पहिल्या क्रमांकावर आहे. एकूण विक्री झालेल्या सौंदर्य प्रसादनांपैकी 38 टक्के वाटा हा लिपस्टिकचा आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नेल पॉलिश आहे. भारतीयांनी कलर्ड ब्युटी प्रोडक्टसाठी मागील 6 महिन्यांमध्ये 1214 कोटी रुपये खर्च केले आहेत. सौंदर्य प्रसादनांसंदर्भातील जागृकता मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळेच चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिला अधिक पैसे मोजण्यासही तयार असल्याचं हल्ली पहायला मिळतं. खास करुन कॉर्परेटमध्ये काम करणाऱ्या महिला दर्जाला प्रथम प्राधान्य देतात असं दिसून आलं आहे.