परशुमार वाघमारेचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला द्यायला नकार

दाभोलकर-पानसरेंच्या हत्येचे धागेदोरे हाती लागणार?

Updated: Jun 18, 2018, 04:46 PM IST

बंगळुरू : कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश हत्याप्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी परशूराम वाघमारे याचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला देण्यास नकार दिलाय. मात्र वाघमारेची कर्नाटकातच दोन तास चौकशी करण्याची परवानगी महाराष्ट्र एसआयटीला देण्यात आलीय. परशूराम वाघमारे यांच्या चौकशीतून दाभोलकर आणि पानसरेंच्या हत्या प्रकरणाचे काही धागेदोरे हाती लागतात का हे या तपासातून पुढं येण्याची शक्यता आहे. मात्र केवळ दोन तासांत महाराष्ट्र एसआयटीला तपास करण्यात किती यश येणार हा खरा प्रश्न आहे.