कर्नाटकातील तीन अपात्र आमदार लढवू शकत नाही निवडणूक ?

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएचे सरकार कोसळल्यानंतरही अजुनही राजकीय धक्के बसत आहेत.  

ANI | Updated: Jul 25, 2019, 10:12 PM IST
कर्नाटकातील तीन अपात्र आमदार लढवू शकत नाही निवडणूक ?  title=

बंगळुरु : कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएचे सरकार कोसळल्यानंतरही अजुनही राजकीय धक्के बसत आहेत. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज, गुरुवारी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी तीन आमदारांवर कारवाई केली. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय कायम राहिला तर आता त्या बंडखोर आमदारांना निवडणूकही लढविता येणार नाही.

Karnataka Speaker disqualifies Independent MLA R Shankar, two Congress rebels

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश यांनी तीन बंडखोर आमदारांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले आहे. यात अपक्ष आमदार आर. शंकर आणि काँग्रेस आमदार रमेश जरकीहोळी आणि महेश कुमटल्ली यांचा समावेश आहे. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आताची विधानसभा समाप्त होईपर्यंत या तिन्ही आमदारांना निवडणूक लढता येणार नाही.

विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी पत्रकार परिषद घेत आमदारांच्या अयोग्यतेच्या मुद्द्यावर भाष्य केले. त्यात त्यांनी तीन बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द केल्याचे सांगितले.