Today Gold Silver Price: आज कार्तिक अमावस्या असून सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास आज स.11:15 ते दु.12:21 या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. याचपार्श्वभूमीवर आज कार्तिक अमावस्या (Kartik Amavasya 2022) असल्याने सोने खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आताच 24 कॅरेट ते 18 कॅरेटचे दर तपासून घ्या. (gold silver price update 23 November 2022)
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोनं खरेदी (gold rate) करणं स्वस्त झालं आहे. दरम्यान आजही सोन्याच्या दरात घसरण दिसत आहे तर चांदीच्या दरात मात्र तेजी दिसून येत आहे. आज कार्तिक अमावस्या (Kartik Amavasya 2022) असल्याने सोने खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. यामध्ये आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,340 तर 24 कॅरेट साठी 52,740 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 612 रुपये आहे.
24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर
चेन्नई - 53,510 रुपये
दिल्ली - 52,900 रुपये
हैदराबाद - 52,740 रुपये
कोलकत्ता - 52,740 रुपये
लखनऊ - 52,900 रुपये
मुंबई - 52,740 रुपये
नागपूर - 52,740 रुपये
पुणे - 52,740 रुपये
सोन्याची शुद्धता अशी तपासा
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
वाचा: निराधार मुलांना आधार देणाऱ्या नगरीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून घेतला जीव
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात
हॉलमार्क (Hallmark)
सोने खरेदी करताना सुरूवातीला त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.