Amritpal Singh Arrest: पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' (Waris Punjab De) संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला जेरबंद करण्यात अखेर पंजाब पोलिसांना यश आले आहे (Amritpal Singh Arrest). पंजाब पोलिसांची मोठी कारवाई मानली जात आहे. जालंधरमधील मेहतपूर येथील गुरुद्वारा साहिबमध्ये तो आपल्या साथीदारांसह लपून बसला होता. पोलिसांनी या सर्वांना अटक केली असून यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी अमृतपालच्या 6 साथीदारांना अटक केली होती. त्यानंतर अमृतपाल फरार झाला होता. अमृतपाल याला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केली होती. दरम्यान अमृतपाल याचे साथीदार इंटरनेटवर आपल्या समर्थकांकडे मदत मागत होते. अखेर पोलिसांनी सर्व ठिकाणी नाकाबंदी करत जालंधर येथून अमृतपाल याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग यांच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दोन गुन्हे हे चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी दाखल झाले आहेत. धरमकोटजवळील महितपूर पोलिस स्टेशनजवळ पोलिसांनी अमृतपाल याच्या सहा साथीदारांना अटक केल्यानंतर तो देखील पोलिसांच्या हाती लागला आहे.
पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट धमकी दिली होती. खलिस्तानी चळवळीच्या विरोधात जाल तर इंदिरा गांधी यांना चुकवावी लागलेली किंमत तुम्हालाही चुकवावी लागेल अशी उघड धमकी त्याने दिली होती. अमित शाह यांनी हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांचं समर्थन केलं तर ते गृहमंत्रीपदावर कसे राहतील हेदेखील पाहून घेऊ असंही तो म्हणाला.
मागील अनेक काही दिवसांपासून अमृतसरमध्ये खलिस्तान समर्थकांचा राडा पहायला मिळाला. हजारो खलिस्तानी समर्थक रस्त्यावर उतरले. पोलीस आणि खलिस्तान समर्थक भिडले होते. पोलीस ठाण्यावरच खलिस्तान समर्थकांनी कब्जा मिळवला होता.
अमृतपाल हा अमृतसरमधील जंदुपूर खेरा या गावचा रहिवासी आहे. 2012 पूर्वीच अमृतपालचे कुटुंब दुबईला गेले. ऑगस्ट 2022 मध्ये अमृतपाल कुटुंबियांना दुबईतच सोडून पंजाबमध्ये परत आला. यानंतर त्याने ऑक्टोबर महिन्यात ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. स्वत:ला जर्नेल सिंग भिंद्रनवाला यांचा अनुयायी असल्याचे सांगून शीख तरुणांना पुढील युद्धासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. यानंतर गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या. अमृतपाल याने दुबईतच खलिस्तानी विचारसरणीच्या प्रभावात आल्याचे समजते. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या पंजाबी गायक दीप सिद्धूने ‘वारीस पंजाब दे संघटना सुरु केली. तरुणांना शीख धर्माच्या मार्गावर आणणे आणि पंजाबी जनतेला त्यांचे अधिकार आणि हक्कांबाबत जागकरु करणे हा या संघटनेचा मुख्य हेतू आहे.