या चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पोलीस अधिकाऱ्यांसह या छोट्या मुलाचा हसतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा फोटो आयपीएल अधिकारी स्वाती लाकरा यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनीही याला रिट्वीट केलेय. या फोटोला मोठ्या प्रमाणात यूजर्सनी कमेंट तसेच लाईक्स दिल्यात.

Updated: Oct 9, 2017, 09:33 PM IST
या चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल title=

हैदराबाद : पोलीस अधिकाऱ्यांसह या छोट्या मुलाचा हसतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा फोटो आयपीएल अधिकारी स्वाती लाकरा यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनीही याला रिट्वीट केलेय. या फोटोला मोठ्या प्रमाणात यूजर्सनी कमेंट तसेच लाईक्स दिल्यात.

या फोटोत नामपल्लीचे एसएचओ आर. संजय कुमार एका चार महिन्यांच्या मुलाला हातात घेतल्याचे दिसतेय. हा चिमुकला संजय यांच्याकडे पाहून खुदखुदू हसतोय.

हा चिमुकला आपल्या आईसह रस्त्याच्या कडेला झोपला असताना त्याचे अपहरण करण्यात आले. मात्र पोलिसांनी अवघ्या १५ तासांत त्याला शोधले. 

फैजान खान असं या चिमुकल्याचे नाव आहे. फुटपाथवर आपल्या आईसह झोपलेल्या फैजानचे दोन लोकांनी मध्यरात्रीच्या सुमारास अपहरण केले 

चिमुकल्याची आई हमीरा बेगम रस्त्यावर भीक मागून आपला उदरनिर्वाह करते. रात्रीच्या सुमारास ती फुटपाथवर झोपलेली असताना मोहम्मद मुस्ताक आणि मोहम्मद युसुफ या दोघांनी चिमुरड्याचे अपहरण केले. या चिमुकल्यायाल विकण्याचा त्यांना प्लान होता. मात्र पोलिसांनी १५ तासांचा याचा शोध घेत दोघांना अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी चिमुकल्याची आई उठल्यानंतर तिला लक्षात आले की आपलं बाळ कोणीतरी नेलयं. त्यानंतर तिने तात्काळ पोलिसांकडे याबबत तक्रार केली.