मळकट झालेले पांढरे शूज घरच्या घरी करा साफ, फक्त 2 मिनिटांत होतील स्वच्छ

White shoes strain Hacks: पांढऱ्या शूजवरील हट्टी डाग कसे काढायचे असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर या हटके टिप्स वापरून पाहा 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 6, 2023, 04:12 PM IST
मळकट झालेले पांढरे शूज घरच्या घरी करा साफ, फक्त 2 मिनिटांत होतील स्वच्छ title=
kitchen hacks How to Clean White shoes Sneakers at home in marathi

White shoes strain Hacks: पांढऱ्या रंगाचे शूज हे आता स्टाइल स्टेटमेंट झाले आहे. प्रत्येक रंगाच्या कपड्यावर या रंगाचे शूज शोभून दिसतात. तसंच, मुलांसह मुलीही पांढरे शूज वापरु शकतात. वनपीस, जंपसूट ते जीन्सवरही हे या रंगाचे शूज उठून दिसतात. मात्र पांढरे शूज कॅरी करणे मोठे अवघड असते. कारण पांढऱ्या रंगावरील डाग लगेचच उठून दिसतात. त्यामुळं शूजची काळजीही तितकीच घ्यावी वाहते. अनेकजण पांढरे शूज साफ करण्यासाठी बाहेर बाहेरुन क्लिनर विकत आणतात. मात्र, तुम्ही किचनमधले हे पदार्थ वापरून घरच्या घरीही तुम्ही  ते साफ करु शकतात. जाणून घ्या कसं ते. 

पांढऱ्या रंगाचे शूज घरच्या घरीही साफ करणे फार सोप्पं असते. त्यासाठी तुमचे किचनमधील पदार्थच उपयोगी ठरु शकतात. तर जाणून घेऊया घरच्या घरी पांढरे शूज कसे साफ करता येतील ते. 

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर या दोघांमधील गुणधर्म शूज साफ करण्यास मदत करते. या दोघांच्या मिश्रणाने दुर्गंधी व फंगसची वाढ रोखता येते. पण हे मिश्रण वापरण्यापूर्वी लक्षात घ्या की, फक्त लेदर, रेग्जीनपासून बनवलेले शूज किंवा कपड्यांपासून बनवलेले शूजच साफ करा. 

एका वाटीत अर्धा चमचा व्हिनेगर आणि चतुर्थांस कप बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण एकजीव करुन घ्या. जोपर्यंत त्याला फेस येत नाही तोपर्यंत ढवळत राहा. यानंतर एका ब्रशच्या सहाय्याने शूजला हे मिश्रण लावा व काही वेळासाठी तसंच ठेवून द्या. त्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्या. 

टुथपेस्ट

टुथपेस्टमुळं तुमचे शूज एकदम नव्यासारखे चमकतील. लेदर, रेग्जीन किंवा कपड्यांपासून बनवलेल्या शूजचा सोल साफ करण्यासाठी फक्त एक ब्रश आणि टुथपेस्टची गरज आहे. सगळ्यात आधी शूज कपड्याने साफ करुन घ्या. नंतर टुथब्रश ओला करुन त्यावर पेस्ट लावून ठेवा. 10 मिनिटे असंच ठेवून द्या त्यानंतर पुन्हा एकदा शूज टुथब्रशने साफ करा व नंतर पाण्याने धुवा. 

लिंबाचा रस 

लिंबाच्या रसात साइट्रिक अॅसिड असते ज्यामुळं शूज साफ करण्यास मदत होते. तसंच, त्यातील दुर्गंधीही नष्ट करते. थंड पाण्यात एक लिंबू पिळून टाका आणि ते व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण सफेद शूजवर लावा आणि हलक्या हातांनी घासा. 10 मिनिटानंतर शूज पाण्याने धुवा आणि उन्हात सुकवा. 

नेलपेंट रिमुव्हर

लेदर शूज किंवा पांढऱ्या स्नीकर्सवरील स्क्रॅच नेल पेंट रिमूव्हरच्या मदतीने सहज साफ करता येतात. प्रथम कॉटन बॉल एसीटोन रिमूव्हरमध्ये भिजवा आणि नंतर डाग घासून घ्या. नेलपेंट रिमूव्हर हे थोडे हार्ड असू शकते, म्हणून शूजवरील डाग काढून टाकल्यानंतर, शूजवर पावडर किंवा पेट्रोलियम जेली लावा.

साबण आणि पाणी

कोणत्याही प्रकारचे लिक्विड डिशवॉशर तुमचे सफेद स्नीकर्स साफ करु शकतात. कपड्यांचे शूज असल्यास अगदी आरामात साबणाने डाग निघून जातात. त्यासाठी गरम पाणी घेऊन त्यात १ चमचा लिक्विड डिशवॉशर मिसळा. त्यानंतर हे मिश्रण शूजला लावा आणि ब्रशच्या सहाय्याने साफ करा.