मुंबई : लहानग्यांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वजण एकमेकांना मुर्ख बनविण्याचा दिवस म्हणजे १ एप्रिल. पण १ एप्रिललाच 'एप्रिल फूल' हा दिवस का साजरा केला जातो? याबद्दल तुम्हाला माहितेय का ? एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात फ्रान्समधून झाली. पॉप ग्रेगरी १३ यांनी १५८२ यांनी प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून सुरू होतं. अनेक लोकांनी हे मानण्यास नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नव्हती. यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅंक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली.
संपूर्ण जगात हा दिवस एकमेकांना मुर्ख बनविण्यासाठी साजरा केला जाऊ लागला. जपान आणि जर्मनीमध्ये पूर्ण दिवस लोक प्रॅंक करत असतात. स्कॉटलॅंडमध्ये सलग २ दिवस हा दिवस साजरा केला जातो. फ्रान्समध्ये याला 'फिश डे' असे म्हटले जाते. यादिवशी लहान मुल कागदाची मच्छी एकमेकांच्या पाठीवर चिटकवून दिवस साजरा करतात.