गांधीनगर : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी (Chief Minister of Gujarat) घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार (Ghatlodia assembly constituency Mla) असलेले भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी निवड झाली आहे. गांधीनगरमध्ये भाजप आमदार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल आणि नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदी म्हणून पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. पटेल सोमवारी 13 सप्टेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी 11 सप्टेंबरला गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पटेल यांनी त्यांची जागा घेतली आहे. साधारणपणे मुख्यमंत्रिपदी नेमणूक होणाऱ्या सदस्याला 3 ते 4 टर्मचा अनूभव असतो. मात्र पटेल यांची आमदार म्हणून ही पहिलीच वेळ आहे. पटेल यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिलाय, हे आपण जाणून घेऊयात. (know all about the personal life and political career of the newly elected Chief Minister of Gujarat Bhupendra Patel)
वैयक्तिक माहिती...
भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा 1 लाख 17 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. पटेल हे पाटीदार समाजातून आहेत. ते 59 वर्षांचे आहेत. ते अहमदाबादमधील शिलाज भागातील आहेत. पटेल यांनी सिव्हिल इंजिनिअरिगंमध्ये डिप्लोमा केलाय. भूपेंद्र पटेल हे माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मर्जीतले मानले जातात. विशेष म्हणजे गुजराच्या माजी मुख्यंमत्री आनंदीबेन पटेल यांनीही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय.
राजकीय कारकिर्द
पटेल यांनी आमदार होण्यापूर्वी 1999-2000 मध्ये गुजरात महानगरपालिकेचं स्थायी समिती अध्यक्षपद भूषवलं. तसेच ते मेमनगर नगरपालिकेचे नगराध्यक्षही होते. त्यानंतर पटेल हे थलतेज या प्रभाागातून 2010-2015 मध्ये नगरसेवकही होते. यानंतर पटेल यांनी 2015-17 मध्ये अहमदाबाद शहर विकास प्राधिकरणाचं अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.