मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकाकडे 500 ची नोट ही असतेच. तुम्हाला हे देखील माहिती असेल की, त्यावर एक सिक्येरिटी थ्रेड असतो. त्यावरुन आपण ठरवतो की, आपली नोट असली आहे की, नकली. परंतु आता असे सिक्येरीटी थ्रेड असलेली नकली नोटही बाजारात आली आहे. अशा बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे आताच तुमच्या जवळ असलेल्या 500 च्या नोटा काढा आणि तपसा की त्या खोट्या तर नाहीत ना?
तुमच्या जवळ असलेल्या 500 च्या नोटीवरील सिक्येरिटी पट्टी गांधीजींच्या फोटोच्या जवळ आहे की दूर? ते पाहा. खरेतर बर्याच नोटांमध्ये हा सिक्येरीटी थ्रेड गांधीजींच्या चित्र जवळ आहे, तर काही नोटींमध्ये ही पट्टी गांधीजींच्या फोटोपेक्षा लांब आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की, ज्या नोटीमध्ये ही पट्टी गांधींच्या फोटो जवळ आहे ती नोट बनावट आहे.
अशा परिस्थितीत, तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे की, सोशल मीडियावर हा जो दावा केला जात आहे तो दावा खरा आहे की खोटा? या व्हायरल पोस्टचे सत्य जाणून घ्या.
सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, '500 रुपयांच्या ज्या नोटीवर गांधीजींच्या फोटोजवळ हिरव्या रंगाची पट्टी बनविली आहे ती घेऊ नका, कारण ती बनावट आहे. फक्त त्याच 500 च्या नोटा घ्या, ज्यात हिरव्या पट्टी RBIच्या गव्हर्नरच्या सहीच्या जवळ आहे. हा संदेश तुमच्या कुटूंबाला आणि मित्रांना द्या.' याच बरोबरच अशा दोन नोटांचे फोटोदेखील पोस्टमध्ये शेअर केले गेले आहेत, ज्यात एका नोटमधील हिरव्या पट्टी गांधीजींच्या फोटो जवळ आहेत, तर एका नोटमधील पट्टी ही गांधीजींच्या फोटोपासून दूर आहे.
सोशल मीडियावर केलेल्या या दाव्याची चौकशी केली असता हा दावा खोटा असल्याचे दिसून आले. त्याचवेळी पीआयबी फॅक्ट चेक टीमनेही याचा तपास केला असता सोशल मीडियावर केलेला दावा चुकीचा असल्याचे निदर्शनास आले आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलने माहिती दिली आहे की, हा दावा बनावट आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार दोन्ही प्रकारच्या नोटा वैध आहेत.
अशा परिस्थितीत, आपल्याकडे असलेल्या नोटा खऱ्या आहेत की, बनावट? हे आपणास जाणून घ्यायचे असल्यास आपण आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते पाहू शकता. तेथे, आपल्याला त्यासंदर्भात सर्व माहिती मिळेल.
500 च्या खऱ्या नोटीला, जेव्हा एका प्रकाशासमोर ठेवाल तेव्हा तुम्हाला येथे 500 लिहलेले दिसेल. त्याच प्रमाणे जर डोळ्यांसमोर 45 अंशांच्या कोनात पाहिलेत तर येथे देखील तुम्हाला 500 लिहिले दिसेल. त्याशिवाय त्यावर देवनागरीमध्ये ही 500 लिहिलेले असते.
दावा: ₹500 का वह नोट नहीं लेना चाहिए जिसमें हरी पट्टी आरबीआई गवर्नर के सिग्नेचर के पास न होकर गांधीजी की तस्वीर के पास होती है।#PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। @RBI के अनुसार दोनों ही तरह के नोट मान्य होते हैं।
अधिक जानकारी के लिए यहाँ जाएं: https://t.co/DuRgmS0AkN pic.twitter.com/2buOmR4iIv
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 25, 2021
जुन्या नोटच्या तुलनेत, महात्मा गांधींच्या चित्राचे ओरिएंटेशन आणि स्थान थोडं वेगळं आहे. तुम्ही नोट थोडीशी फिरविली तर, सिक्येरिटी थ्रेडचा रंग हिरव्याचा निळा दिसायला लागतो. जुन्या नोटीच्या तुलनेत राज्यपालांची स्वाक्षरी, हमीभाव, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआय लोगोला उजव्या बाजूला ठेवले आहे. येथे महात्मा गांधींचे चित्र आहे आणि तेथे इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क देखील आहे.
डावीकडून खाली आणि उझवीकडील नंबर उजवीकडून डवीकडे मोठे होऊ लागते. इथे लिहलेल्या 500 नंबरचा रंग बदलतो. त्याचा रंग हिरव्याचा निळा होतो.