Post Office ची भन्नाट स्कीम, डायरेक्ट मिळणार 16 लाख रुपये, जाणून घ्या प्रक्रिया

पोस्ट ऑफीसच्या अनेक सेव्हिंग स्कीम्स या गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.  

Updated: Nov 26, 2021, 09:27 PM IST
Post Office ची भन्नाट स्कीम, डायरेक्ट मिळणार 16 लाख रुपये, जाणून घ्या प्रक्रिया title=

मुंबई : प्रत्येक गुंतवणूकीत कमी जास्त प्रमाणात जोखीम असतेच. प्रत्येक जण आपल्यानुसार आर्थिक गुंतवणूक करत असतो. तुम्हाला कोणतीही जोखीम घेता गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफीसच्या अनेक सेव्हिंग स्कीम्स तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. आपण अशाच नो रिस्क स्किम बद्दल जाणून घेणार आहोत जिथे नावालाही जोखीम नाही मात्र गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. या स्कीमचं नाव आहे (Post Office Recurring Deposit) पोस्ट ऑफीस रिकरिंग डिपॉझिट. (know to Post Office Recurring Deposit scheme procedure and rules)

जाणून घ्या प्रक्रिया
 
पोस्ट ऑफीस आरडी डिपॉझिट खाते योजनेत चांगल्या व्याजदरासह कमी रक्कम गुंतवण्याची एक शासकीय हमी योजना आहे. या योजनेत तुम्ही किमान 100 रुपयांपासून गुंतवू शकता. तर  जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. तुम्हाला हवेत तितके गुंतवू शकता.  

या योजनेसाठी 5 वर्षांसाठी खांत उघडलं जातं.  मात्र बँक 6 महिने, 1, 2 आणि 3 वर्षांसाठी रिकरिंग डिपॉझिट अकाउंटची सुविधा देतं. या खात्यातील रक्कमेच्या आधारावर प्रत्येक तिमाहीत वार्षिक दराने व्याज जमा केला जातो. 

व्याजाची रक्कम ही प्रत्येक तिमाहीच्या अखेरीस खात्यात जमा केली जाते. त्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) व्याज मोजले जाते आणि प्रत्येक तिमाहीच्या शेवटी ते तुमच्या खात्यात (चक्रवाढ व्याजासह) जोडले जाते.
 
व्याज किती मिळणार? 

रिकरिंग डिपॉझिट स्कीमवर सध्या 5.8 टक्के इतका व्याजदर आहे. हा व्याज दर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकार सर्व लहान बचत योजनेत देणात येणाऱ्या व्याजाचा दर हा प्रत्येक तिमाहीत निश्चित करते. 

एकूण 16 लाख रुपये मिळणार

जर तुम्ही या योजनेत 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार गुंतवता, तर तुम्हाला 10 वर्षांनंतर जमा रक्कमेवर 5.8 टक्के इतका व्याज दरानुसार 16 लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळेल.

दरमहा गुंतवणूक - 10 हजार रुपये 

व्याज दर - 5.8 % 
 
योजनेचा कालावधी - 10 वर्ष 

10 वर्षांनंतर एकूण मिळणारी रक्कम - 16 लाख 28 हजार 963 रुपये 

आरडी खात्याबाबत महत्त्वाची गोष्ट 

या खात्यात तुम्हाल दरमहा न चुकता ठरलेली रक्कम जमा करावी लागेल. रक्कम जमा न केल्यास तुम्हाला दरमहा हफ्त्याची एक टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागेल. तसेच 4 हफ्ते सलग चुकवल्यानंतर खातं आपोआप बंद होईल. 

पोस्ट ऑफीसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास टीडीएस कापला जातो.  जर डिपॉझिट रक्कम ही 40 हजारांपेक्षा अधिक असेल तर वार्षिक 10 टक्के टॅक्स लागू होतो. या योजनेत मिळणाऱ्या व्याजावरही टॅक्स लागतो, मात्र योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यास एकूण रक्कमेवर कोणताही टॅक्स लावला जात नाही.