गरम झाल्यावर दूध भांड्याच्या बाहेर पडतं, मग पाणी का नाही? हे आहे त्यामागील कारण

तुम्ही म्हणाल की, पाणी आणि दुध दोन्ही द्रव्य पदार्थ आहे. मग जे दुधासोबत होते ते पाण्यासोबत का होत नाही? 

Updated: Oct 29, 2021, 04:43 PM IST
गरम झाल्यावर दूध भांड्याच्या बाहेर पडतं,  मग पाणी का नाही? हे आहे त्यामागील कारण title=

मुंबई : तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा दूध गरम होते तेव्हा ते भांड्याच्या वर येऊ लागलते आणि आपण लगेच जर गॅस बंद केला की, ते लगेच भांड्याबाहेर पडते. परंतु पाण्याच्या बाबतीत असे होत नाही. पाणी उकळंत ठेवलं तरी ते उकळंत राहातं परंतु दुधाप्रमाणे ते भांड्याच्या वर येत नाही. मग असं का होत? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आता तुम्ही म्हणाल की, पाणी आणि दुध दोन्ही द्रव्य पदार्थ आहे. मग जे दुधासोबत होते ते पाण्यासोबत का होत नाही?  त्यामागचं कारण काय असावं, तुम्ही कधी असा विचार केला आहे का?

तर याचं कारण आहे दुधामधील घटक. खरेतर दुधामध्ये फॅट, प्रोटीन, लैक्टोज असते. जेव्हा ते गरम होते तेव्हा ते एकमेकांवर प्रतिक्रिया करतात. होते असे की दूध गरम केल्यावर त्यातील पाण्याची वाफ होऊ लागते. ज्यामुळे दुधात फॅट आणि इतर पदार्थांची वाढ होते.

यानंतर फॅट, प्रथिने आणि अनेक घटक वेगळे होऊ लागतात, ते खूप हलके असतात आणि वेगाने वर येतात आणि दुधाच्या वर मलईच्या स्वरूपात पृष्ठभाग तयार करतात, जे नंतर मलई बनते.

यानंतर पाणी वाफेच्या स्वरूपात उडू लागते आणि या सर्व घटकांचा थर वर गेल्याने ते थांबते. मग वाफेचा दाब वाढतो आणि तो हा थर वर ढकलतो आणि वाफ बाहेर येण्याचा प्रयत्न करते. या थराला केसीन थर म्हणतात आणि हा थर वाफेच्या दाबाने वर येतो.

जेव्हा दूधाला खालून गरम केलं जातं, तेव्हा वाफेचा दाब जास्त होतो आणि तो दुधाचा हा थर वर ढकलतो, त्यामुळे दूध भांड्यातून बाहेर पडते.