बिअरच्या बाटल्या हिरव्या किंवा तपकिरी का असतात? दारू पिणाऱ्यांनाही माहीत नसेल याचं उत्तर

तुम्ही जर दारुची बाटली पाहिली असेल, तर तुम्ही कधी हे नोटीस केलंय का, की दारुच्या बाटलीचा रंग हिरवा किंवा तपकिरी रंगाची का असते?

Updated: Jun 8, 2022, 04:27 PM IST
बिअरच्या बाटल्या हिरव्या किंवा तपकिरी का असतात? दारू पिणाऱ्यांनाही माहीत नसेल याचं उत्तर  title=

मुंबई : आपल्याला तर हे माहित आहे की, दारूचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. कारण याच्या सेवनाने अनेक आजार तुम्हाला घेरतात. परंतु लोकांना हे माहित असलं तरी, तरी देखील ते दारु पिणं टाळत नाही. दारु पिणाऱ्या लोकांची डिमान्ड देखील वेगवेगळी असते. कोणी रम पितं, तर कोणी विस्की, तर कोणाला बिअर आवडते. आज आम्ही तुम्हाला दारूशी संबंधित एक मजेदार प्रश्न विचारणार आहोत. ज्याचं उत्तर दारू पिणारे लोक किंवा न पिणारे लोक दोन्ही देऊ शकता. 

तुम्ही जर दारुची बाटली पाहिली असेल, तर तुम्ही कधी हे नोटीस केलंय का, की दारुच्या बाटलीचा रंग हिरवा किंवा तपकिरी रंगाची असते, याचे कारण जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?

नुकत्याच झालेल्या एका स्वतंत्र सर्वेक्षणात दारू पिणाऱ्या शंभरपैकी ऐंशी जणांना बिअर आवडत असल्याचे समोर आले आहे. लोक बिअर पितात पण त्याची बाटली नेहमीच हिरवी किंवा तपकिरी असते हे क्वचितच कोणाच्या लक्षात आले असेल. याचे कारण काय?

बिअर कधीच पांढऱ्या किंवा इतर रंगाच्या बाटलीत का पॅक केली जात नाही? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत.

बिअरची बाटली हिरवी किंवा तपकिरी होण्यामागे एक खास कारण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये बिअरच्या बाटल्या बनवल्या जात होत्या. येथे पूर्वी बिअर बनवली जात होती आणि पारदर्शक बाटल्यांमध्ये दिली जात होती.

या वेळी, बिअर निर्मात्यांच्या लक्षात आले की जेव्हा या पारदर्शक बाटल्यांमध्ये सूर्यप्रकाश पडतो तेव्हा प्रकाशात उपस्थित असलेल्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे आतल्या ऍसिडची तीव्र प्रतिक्रिया होते.

त्यामुळे बिअर पिण्याचे अनेक गैरसोय होऊ लागले आणि लोक त्यापासून दूर राहू लागले. त्यामुळे बिअर कंपन्यांना मोठा फटका बसू लागला.

जेव्हा बिअर कंपन्यांना असा त्रास होऊ लागला, तेव्हा त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. पण एकही उपाय प्रभावी ठरला नाही. अशा परिस्थितीत त्यांनी बाटल्यांवर तपकिरी रंगाचे कोट दिले होतो. तेव्हा हा उपाय कामी आला.

तपकिरी बाटल्यांमध्ये ठेवलेली बिअर खराब झाली नाही. म्हणजेच या रंगामुळे बाटलीमध्ये असलेल्या द्रवापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकला नाही.

पण यानंतर लगेचच दुसरे महायुद्ध झाले, तेव्हा बिअर कंपन्यांसमोर आणखी एक समस्या आली. त्यावेळी तपकिरी बाटल्यांचा दुष्काळ पडला होता. या रंगाच्या बाटल्या मिळणे बंद झाले.

अशा स्थितीत पुन्हा नव्या रंगाची बाटली बनवावी लागली. त्यावेळी हिरवा रंग बिअरसाठी ठरवण्यात आला. त्यामुळेच त्याची निवड करण्यात आली.