कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (kolkata) येथील स्ट्रँड रोड भागात सोमवारी एका बहुमजली इमारतीतील 13 व्या मजल्यावर मोठी आग (fire) लागली. या आगीत आतापर्यंत 9 लोकांचा होरपळून आणि गुदमरल्यामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली. दरम्यान, या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
कोलकाता येथील पूर्व रेल्वे कार्यालयाच्या 13 व्या मजल्याला ही भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. आगीचे लोट आणि धूर यामुळे लोकांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. या आगीत 4 अग्निशमन कर्मचारी आणि 2 रेल्वे अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर एक आरपीएफ जवान आणि आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करण्यात आली. तसेच कुटुंबातील एकाला सरकरी नोकरी दिली जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
West Bengal: Fire breaks out on the 13th floor of a multi- storey building at Strand road in Kolkata. 8 fire tenders reach the spot. More details awaited pic.twitter.com/DLzrmBZDkF
— ANI (@ANI) March 8, 2021
कोलकाता पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले की, ही भीषण घटना सोमवारी 6 वाजून 10 मिनिटांनी घटली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, आग विझवताना आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा 9 झाला. या इमरातीमध्ये पूर्व रेल्वे आणि दक्षिण पूर्व रेल्वे यांचे विभागीय कार्यालय आहे. तर तळमजल्यावर रेल्वे तिकीट आरक्षणचे कार्यालय आहे. अग्निशमक दलाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. 10 अग्निशामक गाड्यांच्या माध्यमातून आग विझविण्याचे काम सुरु आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे.
The property belongs to railways, it's their responsibility but they were unable to provide map of building. I don't want to do politics over the tragedy but no one from railways has come here: West Bengal Chief Minister Mamata Banerjee at #kolkatafire incident site last night pic.twitter.com/KCaRyZgpWy
— ANI (@ANI) March 8, 2021