मुंबई : रेल्वे स्टेशनवर एका नव्या स्वयंचलित जिन्याचे उद्घाटन अगदी अनोख्या पद्धतीने करण्यात आलं. या उद्घाटनाला एका मुख्य अतिथीला बोलवण्यात आलं होतं. या उद्घाटन सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अधिकाऱ्यांनी सगळ्यांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.
Escalator स्वयंचलित जिन्याचं उद्घाटन तिथेच काम करणाऱ्या एका मजुराच्या मुलीकडून करण्यात आलं. तर झालं असं, उद्घाटनाच्या क्षणी अतिथींची वाट बघण्यात सगळ्यांचाच खोळंबा होत होता. यावेळी वाट बघून कंटाळलेल्या लोकांनी कौतुकास्पद निर्णय घेतला. त्याच ठिकाणी काम करणाऱ्या एका महिला मजुराच्या मुलीच्या कोमल हातांनीच ही फित कापून घेतली.
Labourer’s Daughter Inaugurates Bengaluru Railway Station Escalator @PMOIndia @narendramodi@PiyushGoyal @RailMinIndia
Atleast in IR, request you to consider this practice of honouring the hardworking citizens of India
The + impact & optimism it will create is limitless pic.twitter.com/vGzQCqePnj
— Bhushan Reddy (@bhushan_UWH) November 12, 2019
अयोध्या निर्णयाच्यावेळी कलम 144 लागू केलं होतं. यावेळी बंगलुरू स्टेशनवर सार्वजनिक सोहळा आयोजित केला होता. यावेळी नवीन लिफ्ट आणि एसी हॉलचे उद्घाटन करण्यात येणार होते. आणि हे उद्घाटन बंगलुरू केंद्रीय मंत्री पी सी मोहन यांच्याद्वारे होणार होते. पण ते वेळेत न पोहोचल्यामुळे उपस्थितांचा खोळंबा झाला.
बराच वेळ वाट पाहिल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना मोठा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिथे अनेक महिन्यांपासून काम करणाऱ्या 32 वर्षीय मजुर महिला चांदबीबी यांना आमंत्रित केलं. त्यांची 10 वर्षीय मुलगी बेगम रायचूरकडून उद्घाटनाची फित कापून घेतली. उद्घाटनाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रेल्वे स्टेशनची आणि अधिकाऱ्यांची खूप चर्चा होत आहे. या प्रसंगाने सगळ्यांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.
अनेकदा आपण पाहतो की, राजकीय व्यक्ती किंवा सेलिब्रिटीजकडून उद्घाटन करून घेण्याकरता रस्त्यांवर ट्रॉफिक लागते. किंवा सामान्यांची गैरसोय होते. पण या रेल्वे अधिकाऱ्यांनी परिस्थिती ओळखून निर्णय घेतला.