भोपाळ : राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळाप्रकरणी साडेतीन वर्षाची शिक्षा आणि ५ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
बिरसाच्या मुंडा जेलमध्ये ते शिक्षा भोगत आहेत.
शिक्षा सुनावल्यानंतरही लालूंना जामीन मिळाला नाही. त्यामूळे राजद उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.
याआधी त्यांना कराव्या लागणाऱ्या कामाची कल्पना दिली नव्हती. पण आता ते जेलमध्ये माळ्याचे काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बिरसाच्या मुंडा जेलमधून लालूंची रवानगी हजारीबाग जेलमध्ये पाठविण्यात येणार आहे. यावेळी माळी काम करण्याचे त्यांना ९३ रुपये रोज मिळणार आहे.