पॅन-आधार लिंक : ..नाहीतर उद्यापासून ५ हजार दंड

 यासाठी पाच हजार रुपये दंडही भरावा लागेल. 

Updated: Jun 30, 2018, 02:37 PM IST

नवी दिल्ली : तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं आहे का... जर तुम्ही तुमचं पॅन आधारशी लिंक केलं नसेल तर आजच करुन घ्या.. कारण पॅन आधारशी लिंक करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. आज पॅन आधारसह लिंक केले नाही तर ते रद्द होऊ शकते. इतकंच नाही तर तुम्हाला यासाठी पाच हजार रुपये दंडही भरावा लागेल. एवढेच नाही तर 31 जुलैपर्यंत आयकर परतावा भरण्यासही तुम्हाला अनेक बाबींचा सामना करावा लागेल.

डेडलाइन संपली

आयकर विभागाने ही तारीख वाढविण्यास नकार दिलाय. केंद्र सरकारने मनी लॉन्ड्रिंग कायद्यातंर्गत बँक अकाउंट, पॅन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी 30 जून ही डेडलाइन दिलेली आहे. आयकर विभागाच्या वेबसाईवर जाऊन किंवा एसएमएसद्वारे तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.