उत्तर प्रदेशमध्येही बिबट्यांचा वावर

राज्यातच नाही तर उत्तर प्रदेशमध्येही बिबट्यांचा मुक्त वावर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Updated: Jan 13, 2018, 08:09 PM IST
उत्तर प्रदेशमध्येही बिबट्यांचा वावर title=

नवी दिल्ली : राज्यातच नाही तर उत्तर प्रदेशमध्येही बिबट्यांचा मुक्त वावर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

युपीची राजधानी लखनऊमधल्या एका शाळेत बिबट्या घुसला,. ठाकूरगंज इथल्या सेंट फ्रान्सिस शाळेत बिबट्या घुसल्याने परिसरात भितीचं वातावरण पसरलंय. ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालीय. बिबट्याच्या एंट्रीमुळे शाळा प्रशासनही हादरुन गेलंय. तात्काळ वनविभागाला पाचारण करण्यात आलंय. वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.