Company fire Employee: अनेक कंपन्यांच्या एचआर पॉलिसीमध्ये किचकट नियम असतात. जे कर्मचाऱ्यांच्या कधीच लक्षात येत नाहीत. पण भविष्यात याच नियमांमुळे कर्मचारी अडचणीत येतात. खासगी नोकरी असो की सरकारी नोकरी, पगारासोबतच कर्मचाऱ्याला इतर काही सुविधाही दिल्या जातात. हक्काच्या सुविधेचा फायदा न देताच कर्मचाऱ्यावर कारवाई करणे कंपनीला महागात पडले आहे. काय आहे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
एखाद्या व्यक्तीला गरजेच्या वेळी रजा घ्यावी लागते. आयर्लंडमधील एका व्यक्तीने अशीच आजारपणासाठी रजा घेतली. मात्र कर्मचाऱ्याने 69 सुट्या घेतल्याने कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी संतप्त झाले आणि त्याला कामावरून काढून टाकले. मा कर्मचाऱ्याने ही रजा एकाच वेळी घेतली नाही तर 16 महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या वेळी घेतली, असे यावेळी सांगण्यात आले. यानंतर जे काही घडले ते कंपनीसाठी अनपेक्षित होते.
मिहलिस बुइनेंको नावाच्या व्यक्तीने आयर्लंडमधील लिडल कंपनीच्या मुख्य कार्यालयात सुमारे 11 वर्षे काम केले. पण 2021 मध्ये जास्त रजा घेतल्याने त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. डेली स्टारने यासंदर्भात वृत्त दिले आहे. यानंतर त्या व्यक्तीने हे प्रकरण वर्कप्लेस रिलेशन कमिशनकडे नेले. आणि यानंतर डब्ल्यूआरसीने बुइनेंकोच्या बाजूने निर्णय दिला. यानंतर कंपनीला त्याच्या माजी कर्मचाऱ्याला 14 हजार युरो भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, लिडल कंपनीने हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत आपण घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान कंपनीने आपल्या माजी कर्मचाऱ्यावर आरोप केला. कर्मचाऱ्याने 69 वेळा सुट्टी घेतली आणि 10 वेळा लवकर घरी निघून गेला. कर्मचाऱ्याने कंपनीचे नियम मोडले आहेत. त्यांने रजा घेण्याचे आणि लवकर निघून जाण्याचे कोणतेही वैध कारण दिले नाही, म्हणून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. ..लिडक ले रिजनल लॉजिस्टिक्सच्या मॅनेजरने असे सांगत आपली बाजू मांडली.
'आजारी असल्यामुळे मी ऑफिसला जाऊ शकत नाही, असे बुइनेंकोने WRC ला सांगितले. कंपनीच्या हँडबुकमध्ये जास्त आजारी रजा घेतल्याबद्दल कोणताही दंड आकारल्याचा नियम नाही.
लिडल कंपनीने कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याने डब्ल्यूआरसीला दिलासा दिला. कंपनीच्या कृत्यामुळे कर्मचाऱ्याला खूप मनस्थाप झाला. यानंतर, जेव्हा WRC ने कंपनीचे धोरण वाचले तेव्हा त्यात आजारी रजेशी संबंधित कोणताही नियम नसल्याचे आढळून आले. यानंतर डब्ल्यूआरसीने कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने कंपनीला 14 हजार युरो म्हणजेच 12 लाख 33 हजार 400 रुपये देण्याचे आदेश दिले.