Madhya Pradesh Election Result 2023 Live : मध्य प्रदेशात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवराजसिंह चौहान यांची 18 वर्षांनंतरही जादू कायम असल्याचं दिसतंय. तर काँग्रेसला सत्तेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लगाण्याचा अंदाज आहे. पोल ऑफ पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला 136, काँग्रेसला 91 तर तीन जागा इतरांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
3 Dec 2023, 08:07 वाजता
Madhya Pradesh Election Result 2023 Live
मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस 6 जागा तर भाजपला 9 जागांवर आघाडीवर आहे.
3 Dec 2023, 08:04 वाजता
Madhya Pradesh Election Result 2023 Live
मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतांची मोजणी सुरु करण्यात आली आहे.
3 Dec 2023, 07:27 वाजता
थोड्याचवेळात मतमोजणी
मध्यप्रदेशमध्ये आता थोड्याचवेळात मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी केंद्रावर अधिकारी आणि उमेदवारांचे कार्यकर्ते पोहचले आहेत. भोपाळमध्ये अधिकाऱ्यांची मोठी लगबग दिसत आहे.
#WATCH | Madhya Pradesh: Preparations underway at the counting centre in Bhopal as the counting of votes will begin shortly. pic.twitter.com/Qn5gCsGbiV
— ANI (@ANI) December 3, 2023
3 Dec 2023, 07:18 वाजता
मध्यप्रदेशात कोणाची प्रतिष्ठा पणाला आहे पाहूयात
होशंगाबादमध्ये दोन भावांमध्ये ही लढत होत आहे. भाजपच्या सीताशरण शर्मांविरोधात काँग्रेसकडून गिरीजाशंकर शर्मा उभे आहेत. एक विद्यमान आमदार तर एक माजी आमदार आहेत. पूर्वी दोघेही भाजपमध्ये होते.
3 Dec 2023, 07:17 वाजता
मध्यप्रदेशात कोणाची प्रतिष्ठा पणाला आहे पाहूयात
चाचोडामध्ये काँग्रेसचे लक्ष्मण सिंग विरुद्ध प्रियंका मीना यांच्यात थेट लढत होतेय.. 2018 मध्ये लक्ष्मण सिंग यांनी भाजपचा ममता मीना यांचा 9 हजार मतांनी पराभव केला होता. ममता मीना यांना यावेळी तिकीट अपेक्षित होतं. मात्र काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका मीना यांना भाजपनं तिकीट दिलं आहे. त्यामुळे ममता मीना यांनी बंडखोरी केली आहे.
3 Dec 2023, 07:16 वाजता
मध्यप्रदेशात कोणाची प्रतिष्ठा पणाला आहे पाहूयात
ग्वाल्हेर पूर्वमधून भाजपच्या मायासिंग विरुद्ध काँग्रेसच्या सतिश सिकरवार यांच्यात लढाई आहे.. 2018 मध्ये या मतदारसंघातून ज्योतीराधित्य शिंदे यांचे समर्थक मुन्नालाल गोयल निवडूण आले होते. मात्र त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिंदे यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मुन्नालाल गोयल यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांना आता तिकीट नाकारण्यात आले आहे. तिकीट नाकरल्यानंतर त्यांनी मोठा गदारोळ केला होता. माया सिंग यांच्यावर जोरदार टीकाही केली होती.