Madhya Pradesh Election Result 2023 Live : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा राजीनामा

Madhya Pradesh Election Result 2023 Live : मध्यप्रदेशात कोणाची सत्ता येणार याचा फैसला आज होणार आहे. 230 जागांसाठी आज मतमोजणी होणार असून भाजप आणि काँग्रेसमध्ये इथं चुरशीची लढत होणार आहे.   

Madhya Pradesh Election Result 2023 Live : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा राजीनामा

Madhya Pradesh Election Result 2023 Live : मध्य प्रदेशात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवराजसिंह चौहान यांची 18 वर्षांनंतरही जादू कायम असल्याचं दिसतंय. तर काँग्रेसला सत्तेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लगाण्याचा अंदाज आहे. पोल ऑफ पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला 136, काँग्रेसला 91 तर तीन जागा इतरांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

3 Dec 2023, 12:39 वाजता

Madhya Pradesh Election Result 2023 Live
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतलं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. जनतेने पुन्हा एकदा भाजपाला भरभरुन मतं दिली आहे. 230 जागा असलेल्या मध्यप्रदेशमध्ये बहुमतासाठी 116 जागांची आवश्यकता असते. भाजपने 160 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 65 जागांवर अडकली आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपचं सरकार येणार निश्चित झालं आहे. पण शिवराज सिंह चौहान यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणार की इतर कोणावर जबाबदारी सोपवणार याचा निर्णय लवकरच स्पष्ट होईल. 

 

3 Dec 2023, 10:33 वाजता

3 Dec 2023, 09:36 वाजता

Madhya Pradesh Election Result 2023 Live
मध्यप्रदेशमध्ये कलानुसार भाजपाला स्पष्ट बहुमत, भाजप 131 जागांवर आघाडीवर तर काँग्रेसला 87 जागा, निकालानंतर भाजपचे शिवराजसिंग चौहान यांचं ट्विट, आम्ही सरकार बनवणार असं ट्विटमध्ये त्याने म्हटलंय.

3 Dec 2023, 09:27 वाजता

Madhya Pradesh Election Result 2023 Live
मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट, काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदावर कमलनाथ हे छिंदवाडा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. 

3 Dec 2023, 09:14 वाजता

Madhya Pradesh Election Result 2023 Live
मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीची मतमोजी, सुरुवातीच्या कलानुसार मध्यप्रदेशमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केलाय. भाजपमध्ये 121 जागांवर तर काँग्रेस 100 जागांवर आघाडीवर आहे. 

 

3 Dec 2023, 08:58 वाजता

Madhya Pradesh Election Result 2023 Live
मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीची मतमोजी, भाजप आणि काँग्रेसमध्य अटीतटीची लढाई सुरु आहे. काँग्रेसने आघाडी घेतली असून 96 जागांवर काँग्रेस तर 93 जागांवर भाजप आघाडीवर आहे. इतर पक्षांनी दोन जागेवर खातं खोललं आहे. 

3 Dec 2023, 08:42 वाजता

Madhya Pradesh Election Result 2023 Live
मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीची मतमोजी, भाजप आणि काँग्रेसमध्य अटीतटीची लढाई सुरु आहे. काँग्रेसने आघाडी घेतली असून 63 जागांवर काँग्रेस तर 54 जागांवर भाजप आघाडीवर आहे. इतर पक्षांना एका जागेवर खातं खोललं आहे. 

3 Dec 2023, 08:30 वाजता

3 Dec 2023, 08:25 वाजता

Madhya Pradesh Election Result 2023 Live
मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीची मतमोजी, भाजप आणि काँग्रेसमध्य अटीतटीची लढाई सुरु आहे. काँग्रेसने आघाडी घेतली असून 47 जागांवर काँग्रेस तर 44 जागांवर भाजप आघाडीवर आहे.

 

3 Dec 2023, 08:14 वाजता

Madhya Pradesh Election Result 2023 Live

मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजप 40 जागांवर तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर