PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी सुमारे 16 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प भेट देणार आहेत. तसेत अयोध्येतील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुनर्विकसित रेल्वे स्थानकासह अन्य प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यासह दोन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. यासोबत पंतप्रधान अयोध्येतील चार नव्याने पुनर्विकसित, रुंदीकरण आणि सुशोभित रस्त्यांचे उद्घाटन करतील.
30 Dec 2023, 15:14 वाजता
PM Modi Ayodhya Visit Live Updates : 550 वर्षे वाट पाहिली, अजून काही दिवस थांबा - पंतप्रधान मोदी
22 जानेवारीच्या कार्यक्रमाबाबत पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना विशेष विनंती केली. पंतप्रधान म्हणाले, मी 140 कोटी देशवासियांना प्रार्थना करत आहे की, 22 जानेवारीला जेव्हा भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान आहेत, तेव्हा त्यांनी घरोघरी श्री रामज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी. 22 जानेवारीची संध्याकाळ भारतभर उजळून निघावी. त्या दिवशी अयोध्येला येणे शक्य नाही. अयोध्येला पोहोचणे सर्वांनाच अवघड आहे. हात जोडून नमस्कार करून, सर्व राम भक्तांना विनंती आहे की 22 जानेवारीला म्हणजे 23 जानेवारीनंतर औपचारिक कार्यक्रम झाल्यावर अयोध्येत यावे. 22 जानेवारीला अयोध्येला यायचे ठरवू नका. आम्ही रामभक्त प्रभू रामाला कधीच त्रास देऊ शकत नाही. 550 वर्षे वाट पाहिली. अजून काही दिवस थांबा.
30 Dec 2023, 15:07 वाजता
PM Modi Ayodhya Visit Live Updates : मी भारतातील लोकांचा पुजारी आहे - पंतप्रधान मोदी
आज संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा स्थितीत अयोध्यावासीयांमध्ये हा जल्लोष आणि उत्साह स्वाभाविक आहे. मी भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि भारतातील लोकांचा पूजक आहे आणि मलाही तुमच्यासारखाच जिज्ञासू आहे, असेही
पंतप्रधान मोदी म्हणाले.
30 Dec 2023, 15:07 वाजता
PM Modi Ayodhya Visit Live Updates : मी भारतातील लोकांचा पुजारी आहे - पंतप्रधान मोदी
आज संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा स्थितीत अयोध्यावासीयांमध्ये हा जल्लोष आणि उत्साह स्वाभाविक आहे. मी भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि भारतातील लोकांचा पूजक आहे आणि मलाही तुमच्यासारखाच जिज्ञासू आहे, असेही
पंतप्रधान मोदी म्हणाले.
30 Dec 2023, 15:05 वाजता
PM Modi Ayodhya Visit Live Updates : देशातील चार कोटी गरीबांना कायमस्वरूपी घरे मिळाली - पंतप्रधान मोदी
अयोध्या धाम जंक्शन आणि अयोध्या विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले. राम मंदिराच्या अभिषेक संदर्भात 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील स्वागतासाठी लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, देशातील चार कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत.
30 Dec 2023, 14:37 वाजता
PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन केले
पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन केले. विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल.
#WATCH | PM Narendra Modi inaugurated Maharishi Valmiki International Airport Ayodhya Dham, in Ayodhya, Uttar Pradesh pic.twitter.com/6phB4mRMY5
— ANI (@ANI) December 30, 2023
30 Dec 2023, 13:19 वाजता
PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले पंतप्रधान मोदी
अयोध्या स्थानकावरून परतत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले. पंतप्रधान अचानक लाभार्थी धनीराम मांझी यांच्या घरी गेले होते. तेथे त्यांची भेट धनीराम मांझी यांच्याशी झाली. धनीराम मांझी यांच्या घरी पीएम मोदी अचानक आल्याने त्यांच्या शेजाऱ्यांनाही धक्का बसला. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्यात उज्ज्वला लाभार्थीच्या घरी जाऊन त्यांच्या घरी चहा घेतला. त्या पीएम उज्ज्वला योजनेच्या 10 कोटीव्या लाभार्थी आहेत.
30 Dec 2023, 12:29 वाजता
PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान मोदींनी अयोध्या धाम स्थानकाचे उद्घाटन केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी पंतप्रधानांसोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. यासोबत अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन नवीन अमृत भारत ट्रेन आणि सहा नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये महाराष्ट्रातील जालना ते मुंबई या वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे.
30 Dec 2023, 12:29 वाजता
PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान मोदींनी देशाला भेट दिल्या 8 ट्रेन
पंतप्रधान मोदींनी अयोध्येत हिरवा झेंडा दाखवून देशाला 8 ट्रेनची भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली, अमृतसर-नवी दिल्ली, कोईम्बतूर-बंगलोर, मंगळुरू-मडगाव, जालना-मुंबई आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल दरम्यान 6 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भेट दिल्या. यासोबतच पंतप्रधान मोदींनी अयोध्या-दरभंगा आणि मालदा टाउन-बंगळुरू दरम्यान 2 अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
30 Dec 2023, 12:03 वाजता
PM Modi Ayodhya Visit Live Updates : अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर पोहोचले पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्याधाम रेल्वे स्थानकावर पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत. अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी सर्वप्रथम तेथे पाहणी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या धाम रेल्वे स्टेशन सुमारे 241 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. अयोध्या धाम रेल्वे स्थानक सर्व आधुनिक सुविधांनी युक्त आहे.
30 Dec 2023, 11:16 वाजता
PM Modi Ayodhya Visit Live Updates : विमानतळावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी केले पंतप्रधान मोदींचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला पोहोचले आहेत. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अयोध्या पहुंचे। उत्तर प्रदेश की राज्यपाल आनंदीबेन पटेल और मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने प्रधानमंत्री का स्वागत किया।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महर्षि वाल्मिकी अंतर्राष्ट्रीय हवाईअड्डा अयोध्या धाम, पुनर्विकसित अयोध्या धाम रेलवे स्टेशन का उद्घाटन… pic.twitter.com/6L6c9k2LiK
— ANI_HindiNews (@AHindinews) December 30, 2023