PM Modi Ayodhya Visit Live : संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहतंय - पंतप्रधान मोदी

PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला येत आहेत. श्री रामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात 22 जानेवारी रोजी राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी त्यांच्या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ, महामार्ग, रेल्वे स्टेशन यासह अनेक मोठ्या प्रकल्पांना भेट देतील.

PM Modi Ayodhya Visit Live : संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहतंय - पंतप्रधान मोदी

PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी सुमारे 16 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प भेट देणार आहेत. तसेत अयोध्येतील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुनर्विकसित रेल्वे स्थानकासह अन्य प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यासह दोन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. यासोबत पंतप्रधान अयोध्येतील चार नव्याने पुनर्विकसित, रुंदीकरण आणि सुशोभित रस्त्यांचे उद्घाटन करतील. 

30 Dec 2023, 09:45 वाजता

PM Modi Ayodhya Visit Live Updates : असा असेल पंतप्रधान मोदींच्या रोड शोचा मार्ग

पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता अयोध्येला पोहोचतील. ते दिल्लीहून अयोध्येला रवाना झाले आहेत. अयोध्येला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी अयोध्या विमानतळावरून धरमपथवर येतील आणि सकाळी 10.30 वाजता रोड शोला सुरुवात करतील. हा रोड शो धरमपथ-रामकथा पार्क-लता मंगेशकर चौक-तुलसी उद्यान-हनुमानगढ़ी चौक-बिर्ला धर्मशाळा-श्री राम चिकित्सालय मार्गे अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

30 Dec 2023, 09:44 वाजता

PM Modi Ayodhya Visit Live Updates : या प्रकल्पांचे उद्धाटन आणि पायाभरणी करणार पंतप्रधान मोदी

- अयोध्या धाम जंक्शनवरून 6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार
-आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार, जाहीर सभेला संबोधित करणार.
-राम पथ (सहदतगंज ते नवीन घाट)
- भक्ती पथ (अयोध्या मुख्य रस्त्यापासून हनुमान गढी मार्गे श्री रामजन्मभूमीपर्यंत)
-धर्म पथ (NH-27 ते नया घाट जुन्या पुलापर्यंत)
-राजर्षी दशरथ स्वायत्त राज्य वैद्यकीय महाविद्यालय
-NH-27 बायपास, महोब्रा बाजार मार्गे तेढी बाजार श्री रामजन्मभूमीपर्यंत 4 लेन रस्ता.
-महर्षी अरुंधती पार्किंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स
- अयोध्या-सुलतानपूर राष्ट्रीय महामार्ग-330 ते विमानतळापर्यंत 4 लेन रस्ता.
-जौनपूर-अयोध्या-बाराबंकी रेल्वे लाईन प्रकल्पांतर्गत चार विभागांचे दुहेरीकरण.

30 Dec 2023, 09:42 वाजता

PM Modi Ayodhya Visit Live Updates : सहा ट्रेनला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

पंतप्रधान मोदी आज अयोध्येत सहा नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर-बेंगलोर कॅन्ट वंदे भारत एक्सप्रेस, मंगलोर-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस यांचा समावेश आहे. 

30 Dec 2023, 09:40 वाजता

PM Modi Ayodhya Visit Live Updates : अयोध्येत पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत 

22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानक आणि नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. अयोध्येला या प्रकल्पांची भेट देण्यापूर्वी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत होणार आहे. अयोध्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींच्या विशेष स्वागताचीही तयारी सुरू आहे. अयोध्येतील मार्ग फुलांनी सजवण्यात आले आहेत. तर शंखध्वनी आणि डमरू वादनाने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येणार आहे. अयोध्येतील प्रत्येक कोपऱ्यात सुरक्षा व्यवस्था पहायला मिळत आहे. लोकनर्तक लोकसंस्कृतीच्या सूर आणि संगीतावर नाचताना दिसत आहेत.

30 Dec 2023, 09:38 वाजता

PM Modi Ayodhya Visit Live Updates : अयोध्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींची पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत स्वागत आणि सत्कार स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी अयोध्या दौऱ्यापूर्वी एक्सवर पोस्ट देखील केली आहे. "आमचे सरकार जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि भगवान श्री रामाची नगरी असलेल्या अयोध्येचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी कटिबद्ध आहे. या दिशेने मी नव्याने बांधण्यात आलेल्या विमानतळाचे आणि पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहे. यासोबतच मला आणखी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याचा बहुमान मिळणार आहे, ज्यामुळे अयोध्या आणि उत्तर प्रदेशसह देशातील अनेक भागात माझ्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन सुसह्य होईल," असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.