नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या जेवणात पाल सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्विटरवर एका प्रवाशाने याचा फोटो रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांना टॅग करत ट्विट केला. उत्तर प्रदेशच्या चंदौलीमध्ये पूर्वा एक्सप्रेसमधून प्रवास करतांना प्रवाशांना देण्यात येणाऱ्या जेवणात पाल आढळली.
झारखंडहून यूपीला चाललेल्या श्रद्धाळुंचा एक समूह ट्रेनमधून प्रवास करत होते. तेव्हा त्यांना रेल्वेकडून बिरयानी देण्यात आली. तेव्हा ट्रेन पटना जवळ होती. त्या बिरयानीमध्ये एक मेलेली पाल आढळली. ज्यामुळे एक व्यक्तीची प्रकृती देखील बिघडली. टीसी आणि पँट्रीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत तक्रार दिली गेली पण त्यांनी यावर दुर्लक्ष केलं. यानंतर प्रवाशांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी ट्विट करत याबाबत तक्रार केली.
ट्विट केल्यानंतर लगेचच ट्रेन जशी यूपीमधील मुगलसराय स्टेशनवर पोहोचली तेव्हा काही वरिष्ठ अधिकारी तेथे पोहोचले आणि प्रकृती बिघडलेल्य़ा त्या व्यक्तीला औषधं दिली गेली. सोबतच कारवाईचा विश्वास देखील दिला.
Chandauli (UP): Lizard found in food served to a passenger on-board Poorva Express; passenger had complained to Railway Minister on Twitter pic.twitter.com/J7jv4s25j7
— ANI UP (@ANINewsUP) July 26, 2017