अहमदाबाद : Lizard In McDonald's Cold Drinks: सोशल मीडियावर कोल्ड्रिंकमध्ये मृत पालीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अहमदाबाद महानगरपालिकेने शनिवारी सोला येथील मॅकडोनाल्डचे आउटलेट सील केले. भार्गव जोशी यांच्या तक्रारीची दखल घेत AMC फूड सेफ्टी ऑफिसर देवांग पटेल यांनी आउटलेटमधून थंड पेयाचे नमुने तपासणीसाठी गोळा केले. हे रेस्टॉरंट तत्काळ सील करण्यात आले आहे.
ग्राहक भार्गव जोशी यांनी शनिवारी आपल्या कोल्ड्रिंकमध्ये मृत पाल आढळल्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. भार्गव जोशी आणि त्यांच्या मित्रांनी आरोप केला, की ते सोला येथील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये चार तासांपेक्षा जास्त वेळ बसले होते. कारण त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेत नव्हतं. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना 300 रुपये परत करण्याची ऑफर दिली. भार्गव जोशी यांनी सीलबंद आउटलेटचे फोटो शेअर केले आणि चांगल्या कामासाठी AMC चे कौतुक केले.
Here is video of this incidents happens with me...@McDonalds pic.twitter.com/UiUsaqjVn0
— Bhargav joshi (@Bhargav21001250) May 21, 2022
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद महानगरपालिकेने मॅकडॉनल्ड्सच्या आउटलेट्सला त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय पुन्हा उघडण्याची परवानगी नाही.
दरम्यान, मॅकडोनाल्ड्सने एका निवेदनात म्हटले आहे की, 'मॅकडोनाल्ड्समध्ये आम्ही आमच्या सर्व ग्राहकांची सुरक्षा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
गुणवत्ता, सेवा, स्वच्छता आणि मूल्य हे आमच्या व्यवसाय ऑपरेशन्सच्या केंद्रस्थानी आहेत.
याव्यतिरिक्त, आमच्या गोल्डन गॅरंटी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, आम्ही आमच्या सर्व मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये 42 कठोर सुरक्षा आणि स्वच्छता प्रोटोकॉल लागू केले आहेत.
ज्यात नियमितपणे स्वयंपाकघर आणि रेस्टॉरंट्सची स्वच्छता आणि स्वच्छता करण्यासाठी कठोर प्रक्रियांचा समावेश आहे.
अहमदाबाद आउटलेटवर कथितपणे घडलेल्या घटनेची आम्ही चौकशी करत आहोत.