Viral Video: अरेच्चा! इथे पाय ठेवायला जागा नाही, त्या ट्रेनमध्ये हा स्पायडरमॅन काय करतोय?

Local Video: अगदी लोकलमध्ये चालायला देखील जागा नाही. अशावेळी एक व्यक्ती एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भन्नाट शक्कल लढवतो. 

Updated: Oct 15, 2022, 02:29 PM IST
Viral Video: अरेच्चा! इथे पाय ठेवायला जागा नाही, त्या ट्रेनमध्ये हा स्पायडरमॅन काय करतोय? title=
Local Spider Man Trending Video on Social media nm

Spider Man Trending Video : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात लोक आपल्या आपल्या गावाकडे जात आहेत. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याचा ट्रेनमध्ये प्रवाश्यांची गर्दी पाहिला मिळतं आहे. अशात ट्रेनमधील एक व्हिडीओ (Video) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की हसू आवरणार नाही. 

हा तर स्पायडर मॅन...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लोकल ट्रेन (Local) प्रवाश्यांनी भरलेली आहे. अगदी लोकलमध्ये चालायला देखील जागा नाही. अशावेळी एक व्यक्ती एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भन्नाट शक्कल लढवतो. तो चक्क स्पायडर मॅनसारखा लटून एका जागेवरून दुसऱ्या जागी जातो. ट्रेनमधील इतर प्रवासी मोठ्या कुतूहलाने हे सगळं पाहत असतात. (Local Spider Man Trending Video on Social media nmp)

कमेंट्सचा पाऊस

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या अकाउंटद्वारे व्हायरल होतो आहे. ट्वीटरवर श्वेता तिवारी या तरुणीने हा व्हिडीओ शेअर करताना मजेशीर कॅप्शन दिलं आहे. PET परीक्षेला जाणारा उत्तर प्रदेशातील तरुण असं व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. तर एका यूजर्सने हा व्हिडीओ शेअर करताना भारतातील स्पायडर मॅन असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.