या राज्यांमध्ये आणखी कठोर होऊ शकतात लॉकडाऊनचे नियम

लॉकडाऊन ४ मध्ये काय असणार नियम

Updated: May 12, 2020, 04:25 PM IST
या राज्यांमध्ये आणखी कठोर होऊ शकतात लॉकडाऊनचे नियम title=

नवी दिल्ली : कोरोनाशी सामना करण्यासाठी देशात ३ वेळा लॉकडाऊन लागू करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे रोजी संपत आहे. त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा वाढणार का याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. देशात अनेक जण लॉकडाऊनच्या बाजुने आहेत. पण देशाची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी उद्योगधंदे सुरु होणं देखील महत्त्वाचं आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मे रोजी म्हणजेच आज रात्री 8 वाजता पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. असा अंदाज वर्तविला जात आहे की, ज्या राज्यात कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत. त्या राज्यात आणखी कठोर लॉकडाऊन जाहीर केले जावू शकते.

वास्तविक, कोरोनामुळे अर्थव्यवस्था ढासळत आहे. राज्यांकडून सतत मदत पॅकेजची मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीत ज्या राज्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. अशा राज्यात आर्थिक गोष्टींसाठी दिलासा मिळू शकेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान आपल्या भाषणात स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरही मत मांडतील कारण ते लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक त्रास सहन करत आहेत.

राज्य सरकारांवर सोपविली जाऊ शकते जबाबदारी

सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह झोनचा निर्णय घेण्यासाठी चर्चा झाली. अनेक राज्यांनी झोन निश्चित करण्यासाठी राज्याला अधिकार देण्याची मागणी केली होती. या बैठकीत 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्यासाठी मागणी केली होती. गुजरात आणि दिल्लीसारख्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आर्थिक उपक्रम वाढविण्यासाठी लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचा पुढील टप्पा हाताळण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपविली जाऊ शकते.

ही राज्ये नियंत्रणात

गोवा, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम, नागालँड या राज्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे. हिंदी भाषित राज्ये (उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, बिहार, झारखंड) येथे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या राज्यांतील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. राज्यांची अर्थव्यवस्था बाधित झाल्याने त्याचा थेट परिणाम केंद्रावर होत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात पंतप्रधान या राज्यांना काही प्रमाणात सूट देतील.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनशिवाय चालणे अशक्य असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. आर्थिक राजधानीत कोरोनाची कहर अशी आहे की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक घेतले पाहिजे. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन वाढविण्यास पाठिंबा दर्शविला आहे. तामिळनाडूनेही रेल्वे आणि हवाई सेवा नाकारल्या आहेत. राजस्थानमधून रेड झोनमध्ये पूर्ण बंदी घालण्याची सूचना देण्यात आली आहे. अशाप्रकारे, मोठ्या राज्यांची परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान तेथे काही मोठ्या घोषणा करु शकतात.