नवी दिल्ली : लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेता येणं शक्य नसल्याचं, मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र अशा प्रकारे एकत्र निवडणुका घ्यायच्या असतील, तर त्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल असंही रावत यांनी म्हंटलंय.
लोकसभा निवडणुकीसोबतच ११ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 'एक देश, एक निवडणूक' अशी भाजपची संकल्पना असून, त्यादृष्टीनं भाजपनं चाचपणी सुरु केलीय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विधी आयोगाला पत्र पाठवून एकत्र निवडणुका घेण्याची मागणी केलीय.