हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद येथून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी दिलेल्या घोषणा पत्रानुसार त्यांच्याकडे 13 कोटींची संपत्ती आहे. निवडणूक आयोगाला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 12 कोटींची अचल तर 1 कोटी 67 लाख रुपयांची चल संपत्ती आहे. याशिवाय त्यांच्याकडे 9 कोटी 30 लाख रुपयांचे येणेही बाकी आहे. त्यांच्याकडे 2 लाख रुपयांची नगद राशी आहे. 2017-18 मध्ये त्यांची कमाई 10 लाख 1 हजार 80 रुपये इतकी होती. तर 2016-17 या वर्षामध्ये त्यांची कमाई ही 13 लाख 33 हजार 250 रुपये इतकी होती.
ओवैसी यांच्याविरूद्ध पाचहून अधिक गुन्हे दाखल आहेत. पण यापैकी एकातही त्यांना दोषी ठरवण्यात आले नाही. निवडणुकीची अधिसुचना जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रीया सुरू झाली. याच्या दोन तासांतच हैदराबादच्या खासदारांनी निर्वाचन अधिकारी आणि हैदराबादच्या जिल्हाधिकारी के. मनिका राज यांच्यासमोर आपले नामांकन दाखल केले. आपल्या पार्टीचे वरिष्ठ नेता आणि आमदार अहमद पाशा कादरी यांच्यासोबत ते जिल्हा निर्वाचन कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला.
लोकसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा निवडून येण्यासाठी ओवैसी रिंगणात उतरले आहेत. ते हैदराबाद लोकसभेतून निवडणूक लढणार आहेत. साधारण तीन दशकांपासून ही जागा एमआयएमचा बालेकिल्ला आहे. त्यांचे वडील सुल्तान सलाहुद्दीन ओवैसी देखील या ठिकाणाहून (1984-2004) सहा वेळा निवडून आले. माझ्याकडे स्वत:च्या मालकीची कार नसल्याचे अर्ज भरताना ओवैसी यांनी सांगितले. तर एनबी बोर .22 ची पिस्तुल आणि एक रायफल असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याची किंमत प्रत्येकी एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.