Loksabha Election : मतांसाठी काय पण? प्रचारासाठी चक्क कंडोमच्या पाकिटांचा वापर

YSRCP VS TDP : लोकसभा निवडणुकीचे पडघमा वाजायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. मतांसाठी पक्षांकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. पण प्रचारासाठी चक्क कंडोमच्या पाकिटांचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 22, 2024, 06:21 PM IST
Loksabha Election : मतांसाठी काय पण? प्रचारासाठी चक्क कंडोमच्या पाकिटांचा वापर title=

Andhra Pradesh Politics : लोकसभा निवडणुक तोंडावरल आली असून प्रत्येक पक्ष आपापली रणनिती आखतोय. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरला जात आहेत. लोकसभेचं तिकट मिळावं यासाठी उमेदवारही वेगवेगळया शकला लढवत आहेत. इच्छूक उमेदवारांच्या अचानक सामान्य नागरिकांना भेटीगाठी सुरु झालं आहे. गावागावात जाऊन कार्यक्रमाला हजेरी लावली जात आहे. उद्घाटनांच्या कार्यक्रमांनाही जोर चढला आहे. पण आंध्रप्रदेशमध्ये (Andra Pradesh) पक्षांनी प्रचारासाठी एक पाऊल रपुढे टाकलं आहे. 

प्रचारासाठी कंडोम पाकिटांचा वापर
आंध्र प्रदेशमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी चक्क कंडोमच्या पाकिटांचा (Condom Packet) वापर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर (YSRCP) काँग्रेस पक्षाने आणि माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देशम पक्षाने (TDP) कंडोमच्या पाकिटांवर पक्षाचं चिन्ह आणि नाव छापलं आहे. विशेष म्हणजे या दोघांनी याचे व्हिडिओ बनवून एकमेकांविरुद्ध आरोप केले आहेत. 

एकमेकांविरोधात आरोप
टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसने कंडोम पाकिटांचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चिन्ह आणि पक्षाचं नाव असलेल्या कंडोमची पाकिटं घराघरात वाटली जात आहेत. वायएसआर काँग्रेसने सोशल मीडियावर टीडीपी पक्षावर कंडोम पाकिटं वाटल्याचा आरोप केला आहे. तर टीडीपीने वायएसआर काँग्रेसचं नाव असलेली पाकिटं दाखवत तुम्ही वेगळं काय केलंय असा सवाल केला आहे. 

एप्रलि किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. याचवर्षी आंध्रप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. वायएसआर काँग्रेस आणि टीडीपी एनडीए किंवा इंडिया आघाडीत सहभागी झालेले नाहीत. पण टीडीपी एनडीएत सहभागी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर प्रदेशात सपा-काँग्रेस एकत्र
लोकसभा निवडणूक 2024 साटी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र लढणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असून यापैकी 17 जागांवर काँग्रेस तर उर्वरीत 63 जागांवर सपा लढणार आहे. अनेक चर्चेनंतर अखेर प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांच्यातील चर्चा  यशस्वी झाली आहे. काँग्रेसबरोबर कोणताही वाद नाही, दोन्ही पक्षांची आघाडी झाल्याचं अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं आहे.