Loksabha Nivdnuk Nikal 2024 : काँग्रेससाठी राहुल गांधी 'बाजीगर', भाजपाचा 400 पार चा नारा फेल?

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 92 जागांवर समाधान मानाव्या लागलेल्या काँग्रेसने 2024 च्या निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे. राहुल गांधी काँग्रेससाठी बाजीगर म्हणून समोर आले आहेत. तर भाजपाचा 400 पारचा नारा फेर ठरला आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 4, 2024, 03:16 PM IST
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : काँग्रेससाठी राहुल गांधी 'बाजीगर', भाजपाचा 400 पार चा नारा फेल? title=

Lok Sabha Chunav 2024: देशात 543 लोकसभा जागांवर मतमोजणी सुरु आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीवर आहे. एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. पण इंडिया आघाडीने (I.N.D.I.A Alliance) आश्चर्यचकीत कामगिरी करत 229 जागांवर आघाडी घेतली आहे. चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपासाठी (BJP) हा मोठा धक्का मानला जातोय तर काँग्रेसच्या गोटात जल्लोषाचं वातावरण आहे. इंडिया आघाडीला बहुमत मिळालं नसलं तरी काँगससाठी राहुल गांधी बाजीगर म्हणून पुढे आले आहेत. 

1. मोदी मॅजिक चालला नाही?
भारतीय जनता पार्टीने यावेळीही लोकसभा निवडणुकीत पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नावावर निवडणूक लढवली. पण यावेळी मोदी मॅजिक चाललं नाही. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपला मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे देशात मोदी मॅजिक कमी झालं का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा फायदा काँग्रेसला झाला आणि कमबॅक करण्यात ते यशस्वी झाले.

2. खटाखटचा डाव चालला
गेल्या तीनही निवडणुकीत काँग्रेस चांगलं प्रदर्शन करताना दिसत आहे. यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यााच खटाखटचा डाव चालला अशी चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी आपल्या एका भाषणात खटाखट, खटाखट असे शब्द उच्चारले होते. केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार येताच प्रत्येक महिन्याला पैसे दिले जातील.  4 जुलैला खात्यात 8500 रुपये येऊ लागतील. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला खटाखट खटाखट पैसे मिळतील असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. 

3. युपी-बिहारमध्ये भाजपाचा जोर ओसरला
गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाला यावेळी मोठा धक्का बसला. याचा थेट फायदा काँग्रेसला मिळाला. इतकंच काय तर महाराष्ट्रातही काँग्रेस पक्ष गेम चेंजर बनला. इथे काँग्रेस पक्षाला नव्याने उभारी मिळाली आहे. हरियाणातही भाजपाला नुकसान झालंय. गेल्या निवडणुकीत काँग्रेस बिहार, महाराष्ट्र आणि हरियाणातही शुन्य होते.

4. प्रादेशिक पक्षांची साथ
काँग्रेसच्या कमबॅकचं आणखी एक मोठं कारण म्हणजे प्रादेशिक पक्षांची मिळालेली साथ. उत्तर प्रदेमध्ये समाजवादी पार्टी आणि बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाबरोबरची हातमिळवणी काँग्रेससाठी फायदेशीर ठरली. गेल्या निवडणुकीत काँग्रेस बिहारमध्ये एकही जागा जिंकू शकली नव्हती. तर उत्तर प्रदेशमध्ये केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. 

5. भाजपाचा 400 चा नारा फेल
लोकसभा निवडणुकीआधी भारतीच जनता पार्टीने 400 पारचा नारा दिला होता.. पण निकालाच्या दिवशी भाजपला तीनशेचा आकडाही पार करता आला नाही. याऊलट एक्झीट पोलमध्ये इंडिया आघाडी 100 ते 150 जागा जिंकण्याचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात इंडिया आघाडी सवादोनशे जागा जिंकताना दिसत आहे.