Loksabha Result: लोकसभा निवडणूक निकालाचे एक्झिट पोल्स समोर येऊ लागले आहेत. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. देशाचा पंतप्रधान कोण होणार? हे या निकालातून ठरणार आहे. दरम्यान इंडिया आघाडीच्या नेत्यांची मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी मिटींग सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी 'इंडिया' आघाडीचे नेते एकत्र आले आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी कॉर्डिनेशन कमेटीची ही बैठक होतेय. या बैठकीसाठी 14 पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या कमिटीचा निर्णय मुंबईतील बैठकीत घेण्यात आला होता. या बैठकीत आगामी निवडणुकीनंतर परिस्थितीसाठी रणनिती बनविण्यात येणार आहे.
या बैठकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधीदेखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत आम आदमी पार्टीचे सर्व्हेसर्वा अरविंद केजरीवालदेखील सहभागी होणार असल्याची माहिती आपचे राघव चढ्ढा यांनी दिली. दरम्यान ममता बॅनर्जी या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्याकडून प्रतिनिधी पाठवला जाण्याची शक्यता आहे.