लव, सेक्स, धोका आणि सूड; हा सिनेमा नाही, एक खरी कहाणी...

खरेतर 11 मे ला सुरेंद्रचा वाढदिवस होता त्यामुळे रुपाली त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन करत होती. परंतु ...

Updated: Jul 10, 2021, 04:52 PM IST
लव, सेक्स, धोका आणि सूड; हा  सिनेमा नाही, एक खरी कहाणी... title=

देवास : चुकीच्या व्यक्तीशी प्रेमा केल्यामुळे लोकांना त्याचे फळ अनेकदा भोगावे लागले आहे. परंतु भारतातील मध्यप्रदेशातील देवास या भागातील दोन व्यक्तींमधील प्रेमाची भरपाई संपूर्ण कुटूंबाला आपला जीव देऊन करावी लागली. कारण मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे  मुलीच्या प्रियकराने तिच्या घरच्या 5 लोकांची हत्या केली आणि त्यांचे मृतदेह स्वत:च्या शेतात 8 फूट खड्डा करुन त्यात पुरले. या प्रकरणात नंतर पोलिसांनी 8 गुन्हेगारांना अटक केली आहे.

रुपाली आणि सुरेंद्र गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. परंतु सुरेंद्नने रुपालीला न सांगता एका मुलीशी साखरपुडा केला. पोलिसांना तपासात समजले की, यांच्या हत्येचे कारण 10 आणि 11 मे रोजी सुरेंद्र आणि रुपालीमधील भांडण आहे.

खरेतर 11 मे ला सुरेंद्रचा वाढदिवस होता त्यामुळे रुपाली त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन करत होती. परंतु त्याचा फोन खूप वेळ व्यस्त लागत होता. त्यामुळे रुपालीला राग आला. त्या आधी रुपालीने 10 तारखेला सुरेंद्र आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचे मॅसेज पाहिले होते. त्यामुळे त्या दोघांचे खूप भांडण झाले होते.

रुपालीला जेव्हा हे संपूर्ण प्रकरण समजलं तेव्हा तिने सुरेंद्रच्या होणाऱ्या बायकोच्या सोशल मीडिया अकाउंटमधून काही फोटो काढले आणि फेक अकाउंट क्रियेट करुन काही अनोळखी लोकांना मॅसेज केलं आणि त्यांच्याशी संपर्क करु लागली. ज्यामुळे सुरेंद्रला खूप राग आला आणि त्याने रुपालीला जीवे मारण्याचा विचार केला.

यासाठी त्याने रुपालीला 13 मे ला फोन केला आणि तिला बोलण्यासाठी त्याच्या शेतात बोलावलं आणि तिची हत्या केली. रुपालीच्या सोबत तिचा भाऊ पवन देखील तिच्या सोबत आला होता. परंतु सुरेंद्रच्या मित्रांनी त्याला बोलण्यात व्यस्त ठेवलं आणि रुपालीच्या मृत्यूबद्दल कळू दिलं नाही. त्यानंतर त्यांने पवनला रुपालीच्या घरच्यांना बोलण्यासाठी पाठवलं.

पवन देखील त्याच्या आईला आणि बहिणींना बोलावून घेऊन गेला. त्यानंतर त्या चौघांनाही सुरेंद्र आणि त्याच्या मित्राने मारुण त्याच्या शेतात 8 फूट ख़ड्डा करुन पुरलं.

परंतु त्यावेळेस घरातील अन्य दोन सदस्य भारती आणि संतोष गावाच्या बाहेर होते, ते घरी येताच त्यांना कोणी ही दिसलं नाही. म्हणून त्यांनी आजूबाजूला विचारपुस केली. त्यावेळी रुपालीच्या फोनवरुन भारतीला एक मॅसेज आला ज्यामध्ये रुपालीने लिहले होते की, तिचं एका मुलासोबत लग्न झालं आहे आणि ती गावातून पळून गेली आहे. त्यामुळे तिचा शोध कोणीही घेऊ नये.

परंतु नंतर भारतीच्या लक्षात आले की, ही मॅसेज केलेली भाषा रुपालीची नाही, कारण ती तिच्याशी अशा भाषेत कधी बोलत नव्हती. त्यामुळे नंतर ती त्या ठिकाणी गेली, जेथे रुपालीने घर भाड्याने घेतलं होतं. परंतु तेथे तिला रुपाली दिसली नाही, परंतु सुरेंद्र मात्र तेथे होता.

त्यावेळास भारतीने पोलिसांना सुरेंद्रची विचारपुस करण्यास सांगितले. परंतु पोलिसांना त्या अँगलने या केसकडे पाहिले नाही, त्यांचं म्हणणे असे होते की, त्यांनी रुपालीचा फोन ट्रेसकरुन तिचे लोकेशन चेक करावे. कारण यामध्ये मानव तस्करीची शक्यता जास्त आहे.

परंतु शेवटी पोलिसांच्या हातात काहीच लागले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गुप्त हेरांना कामाला लावले. तेव्हा सुरेंद्रचा भाऊ विरेंद्र दारुच्या नशेत असताना पोलिसांना म्हणाला की, त्यांनी काहीही केलं तरी रुपाली त्यांना कधीच सापडणार नाही. त्यावेळी पोलिसांना त्याच्य़ावर संशय आला.

त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्रला देखील या घटनेची विचारपूस करण्यासाठी बोलावलं आणि त्याला बोलतं केलं. तेव्हा सुरेंद्रकडून माहिती घेऊन पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने सुरेंद्रच्या शेतात खोदकाम करायला सुरवात केली, तेव्हा त्यांना रुपाली आणि तिच्या कुटूंबीयांचे मृतदेह सापडले.