कोरोना व्हायरस : अमृतसरच्या सुवर्णमंदिरात गोरगरिबांसाठी लंगर सेवा

कोरोना व्हायरसमुळे अनेक देशातील जनतेला अनेक कठिण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.    

Updated: Mar 24, 2020, 09:38 PM IST
कोरोना व्हायरस : अमृतसरच्या सुवर्णमंदिरात गोरगरिबांसाठी लंगर सेवा  title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे अनेक देशातील जनतेला अनेक कठिण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे गोरगरिबांचं जीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्णमंदिरात गोरगरिबांसाठी लंगर सेवा सुरू करण्यात आली आहे. पंजाब सरकारने राज्यात कर्फ्यू आदेश जारी केलेत. रोजगारावर जगणाऱ्यांची यामुळे अडचण होणार आहे. त्यामुळे अशा गरीब जनतेसाठी रोजच्या जेवणाची सोय अमृतसरच्या सुवर्णमंदिरात करण्यात आलीय. 

कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी पंजाब सरकारनं केंद्राकडे १५० कोटींच्या मदत निधीची मागणी केलीये. त्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री बलबीर सिंह सिद्धू यांनी केंद्र सरकारला पत्रही पाठवलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंजाबमध्ये संचारबदी लागू करण्यात आलीये.

जगभरामध्ये कोरोना व्हायरसचे २,८६,००० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे ११,८३० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या बाहेर कोरोनाचे २,०५,००० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. १८६ देशांमध्ये कोरोना पोहोचला आहे.

एकट्या इटलीमध्ये कोरोनामुळे ४,०३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इराणमध्ये १,५५६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामधून ३२.७० टक्के लोकं आतापर्यंत बरे झाले आहेत.